Devendra Fadnavis News :  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : 'पोटात दुखलं तर औषधासाठी डॉ. एकनाथ शिंदे, पचनी पडलं नाही तर अजितदादा..' ; फडणवीसांची मिश्किली!

Devendra Fadnavis News : "कुंभ नगरी शहरामध्ये, शासनाच्या योजनांचा आज कुंभमेळा आहे."

Chetan Zadpe

Nashik News : नाशिकमध्ये आज राज्य सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य नेतेही उपस्थित होते. याप्रसंगी फडणवीस यांनी ठाकरे गटासह विरोधकांवर सडकून टीका केली आहे, विरोधकाच्या पोटात दुखलं तर त्यावरील औषध देण्यासाठी आम्ही डॉक्टर एकनाथ शिंदेंना आणलं आहे, असे वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सरकारने चांगली कामे केली, लोकांना योजनांचा लाभ दिला , तरी काहींच्या पोटात दुखते. शासन आपल्या दारी’ योजना ही लोकांच्या दारी जाऊन, त्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी आहे. लोकांना लाभ मिळतो म्हणून ते येतात आमच्याकडे येतात, याने तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय?” असा सवाल फडणवीसांनी विचारला. तसेच कुणाला पोटदुखी होत असेल, त्यावरील औषध देण्यासाठी आम्ही डॉक्टर एकनाथ शिंदेंना आणलं आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, “शासन आपल्या दारी नाही तर शासन राम दरबारी देखील आले आहे. फार पूर्वी पासून रामराज्यात अशा प्रकारचं शासन असावे, असे म्हंटलं जातं. सर्वांना समान न्याय, भेदभाव न करता मदत केली पाहिजे . लोकांनी शासनाकडे चकरा मारायची नाही, शासनाने लोकांकडे जायचे आहे. नाशिकसारख्या कुंभ नगरी शहरामध्ये, शासनाच्या योजनांचा आज कुंभमेळा आहे. कधीतरी चांगले काम केले तरी काही लोकांच्या पोटात दुखते. पण त्यांच्या पोटदुखीवर औषध देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना आणलं आहे.जर पचनी पडले नाही तर अजित दादादेखील सोबत आहेत.

"अजितदादा आपल्याला तिन्ही झेंडे घेऊन पुढे जायचे आहे. देशात महाराष्ट्राचा झेंडा उंच ठेवायचा आहे. राज्यासाठी चांगले काम करायचे आहे. गुंतवणुकीत देशात राज्याला पहिले आणण्याचे काम आम्ही एका वर्षात करून दाखविले. आता शेतकऱ्यांच्या योजना आणण्यासाठी आम्ही तिघे मैदानात उतरलो आहोत," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT