Hiraman Khoskar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Hiraman Khoskar : आमदार हिरामण खोसकर यांना 'लकी' ठरणार डोकेदुखी!

Congress Hiraman Khoskar Laki jadhav : शिवसेनेच्या उपनेते असलेल्या माजी आमदार निर्मला गावित आणि काँग्रेसचे आमदार खोसकर यांच्यात 2019 मध्ये लढत झाली होती. हे दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

Sampat Devgire

Hiraman Khoskar News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला इगतपुरीतून चांगली आघाडी मिळाली. त्यामुळे काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. आता काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात पारंपरिक लढत होत आली आहे.

या पार्श्वभूमीवर सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस दोन्हीही महाविकास आघाडीचे घटक आहेत. अशा स्थितीत ही जागा कोणाला हा नवा प्रश्न आघाडीची डोकेदुखी ठरू शकतो.

सध्या शिवसेनेच्या उपनेते असलेल्या माजी आमदार निर्मला गावित आणि काँग्रेसचे आमदार खोसकर Hiraman Khoskar यांच्यात 2019 मध्ये लढत झाली होती. हे दोघेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. या दोघांचीही मतदारसंघात राजकीय जमवा जमवा आणि साखरपेरणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा पेच उद्भवू शकतो.

सध्याच्या निकषानुसार इगतपुरीतून काँग्रेस Congress पक्षाला संधी मिळण्याचे संकेत आहेत. आमदार खोसकर यांची तयारी सुरू आहे. अशातच काँग्रेसमध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. आदिवासी संघटनेचे नेते लकी जाधव यांनीही काँग्रेसकडून उमेदवारीचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत मतदार संघात अनुकूल वातावरण असूनही वरिष्ठ पातळीवर राजकीय पत्ते पिसले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास लकी जाधव हे खोसकर यांची डोकेदुखी ठरू शकतात.

सध्या लकी जाधव यांचे मतदारसंघातील दौरे अनेकांना चर्चेचा विषय देत आहेत. या परिस्थितीत इगतपुरी तालुक्यातील राजकारणात महाविकास आघाडीमध्ये काय घडामोडी घडतात? याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT