first FIR filed against Ashok Kharat wife land fraud Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Land Scam: अशोक खरातच्या सावकारकीचे उड्डाणे कोटीत; पत्नीविरोधात पहिला गुन्हा, शिर्डीतील पीडितेची चार एकर जमीन बळकावली

Ashok Kharat land scam case in Shirdi Maharashtra: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याची पत्नीसह पाच जणांविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Pradeep Pendhare

Ashok Kharat land fraud investigation Shirdi: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना हिच्या बेकायदेशीर सावकारकीचे कोटीत उड्डाणे होती. तसं प्रकरणच शिर्डीत समोर आलं आहे.

याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. जमीन व्यवहारात कोट्यवधीची फसवणूक करत, ही बेकायदेशीर सावकारकी सुरू होती, असे शिर्डी पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं असून, पाच जणांपैकी दोघांना अटक केली आहे.

नाशिकमधील अशोककुमार खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, किरण नानासाहेब सोनवणे (रा. निमगाव, ता. राहाता), अरविंद पांडुरंग बावके (रा. साकुरी, ता. राहाता) आणि अशोक परभत तांबे, अशा पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, शिर्डी (Shirdi) पोलिसांनी तात्काळ कारवाई करत किरण सोनवणे आणि अरविंद बावके या दोघांना अटक केली आहे.

पत्नी कल्पनाविरोधात पहिला गुन्हा

अशोक खरात याच्या भोंदूगिरीची भांडाफोड शिर्डी पोलिसांनीच केला होता. याच शिर्डी पोलिसांनी (Police) आता त्याच्याविरोधात बेकायदेशीर सावकारकीचा प्रकरण समोर आणलं आहे. विशेष म्हणजे, त्याची पत्नी कल्पना देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर येत आहे.

दोन टक्के व्याजाने बेकायदेशीर सावकारकी

अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना हिचा ऑगस्ट 2023 पासून शिर्डी, नाशिक आणि राहाता परिसरात हा जमीन व्यवहाराचा घोळ सुरू होता. पीडित व्यक्तीला पैशांची गरज असताना, अशोक खरात याने दरमहा दोन टक्के व्याजाने पैसे दिले होते. याशिवाय अतिरिक्त 2 कोटी 52 लाख रुपये देऊन, त्यातील 1 कोटी 64 लाख रुपये, पुन्हा व्याजापोटी विविध मध्यस्थांच्या माध्यमातून परत घेतले होते.

चार एकर जमीन बळकावली

पीडित व्यक्तीने व्याजाचे पैसे परत केले, असतानाही आणि उर्वरित व्यवहाराचा हिशोब पूर्ण करण्याची तयारी दर्शवली असतानाही, अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना ही व्यवहारासंदर्भात टाळाटाळ करत होते. यानंतर पीडिताने उचललेल्या रक्कम आणि व्याजापोटी गहाण ठेवलेली हक्काची चार एकर जमीन नावावर करून न देता फसवणूक केली.

कोरे धनादेश स्वाक्षरी करून ताब्यात घेतले

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नव्हतं, तर पीडित व्यक्तीचे स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश विश्वासाने एका आरोपीकडे ठेवले होते. याचा गैरवापर करून खात्यातील रक्कम परस्पर वर्ग करण्यात आल्याचा प्रकार पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आला आहे.

अशोक खरात याचा भांडाफोड झाल्यानंतर, पीडित व्यक्ती समोर येत शिर्डी पोलिसांकडे तक्रार दिली. शिर्डी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316(2), 318(2), 318(4) आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014चे कलम 39 व 44 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT