Sanjay Raut & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही!

भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा समाचार घेतला.

Sampat Devgire

मुंबई : भाजपशी (BJP) काडीमोड केल्यावर शिवसेनेच्या (Shivsena) सर्व आमदार आणि खासदारांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवायला हवी होती. त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या तक्रारींना काहीच अर्थ नाही. पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही, असा दावा भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. (Shivsena leader Sanjay Raut is niglected now)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना श्री महाजन म्हणाले, शिवसेनेचे अठरा खासदार आमच्यामुळे निवडून आले. त्यातील एखादा खासदार तर शिवसेना पुन्हा निवडून आणून दाखवील का?. पुढच्या निवडणूकीत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या सध्याच्या राजकारणाला आणि संजय राऊत यांच्या भाजपवरील टिकेला काहीच अर्थ नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने खासदार संजय राऊत अदखलपात्र झाले आहेत.

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मंत्रीमंडळ विस्ताराला विलंब होतो आहे. सध्या दोघांचेच राज्य आहे, अशी टीका केली आहे. त्याबाबत महाजन म्हणाले की, मंत्रीमंडळ विस्ताराला विलंब झाला हे ववस्तव आहे. मात्र याचा अर्थ सरकारचे कामं थांबलेली नाहीत. आमचे दोन्ही नेते दौरे करीत आहेत. फिरत आहेत. तीन कॅबीनेटच्या बैठका झाल्या आहेत. पूर्वीच्या सरकारच्या तुलनेत चागंलेच चाललेले आहे.

ते म्हणाले, पुर्वीचे मुख्यमंत्री तर मंत्रालयात येतच नव्हते. कोणाला भेटत नव्हते. बैठकांना उपस्थित रहात नव्हते. सह्या देखील करीत नव्हते. शेवटच्या काही बैठकांना ते उपस्थित राहिले. यावेळी जे पटपट निर्णय आहे, तेव्हढेच घाईगर्दीत निर्णय झाले. सरकार अल्पमतात असताना असे निर्णय घेतले जात नाहीत. त्यांनी तसे निर्णय घेतले. त्याची गरज नव्हती. त्यामुळेच आम्हाला ते निर्णय बदलावे लागले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून वरीष्ठ नेत्यांना वेळ मिळाला की मंत्रीमंडळ विस्ताराचे काम होईल. गेल्या अडीच वर्षाचा बॅकलॅाग भरून काढला जाोईल.

डिसले गुरूजी मुख्यमंत्री भेट

माध्यमांच्या मार्फतच मला डिसले गुरूजींच्या निर्णयाबाबत माहिती मिळालेली आहे. त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे. आता ते काही तरी अमेरिकेला किंवा अन्य देशात जात आहेत, हे मी ऐकले आहे. असा कोणी चांगला माणूस असेल तर त्याची दखल घेतली पाहिजे. मात्र त्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे देखील काही म्हणने आहे. त्यामुळे याबाबत मी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा विषय घातला होता. त्यानुसार डिसले गुरुजी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. याबाबत प्रशासन तसेच डिसले गुरूजी दोन्ही बाजू समजून घेतल्या जातील. त्यावर काही तरी चांगला तोडगा निघेल असे वाटते.

यापूर्वीही त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. ते गैरहजर राहिले याबाबत कारवाई योग्य वाटते का? यावर श्री. महाजन म्हणाले, याबाबत मला फार काही माहिती नाही. असे व्हायला नको, मात्र तसे घडत असेल तर का घडते याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितच तोडगा काढला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT