Nandkumar Aher
Nandkumar Aher Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये कंपनी गेटवरच उद्योजक नंदकुमार आहेर यांचा खून!

Sampat Devgire

नाशिक : अंबड (Nashik) औद्योगिक वसाहतीतील आहेर इंजिनिअरींग कंपनीच्या व्यावस्थापकांचा खून झाला. कंपनीच्या गेटवर सकाळी दहाला अज्ञात व्यक्तीने धारदार शश्त्राने हल्ला केला. त्यात नंदकुमार आहेर (Nandkumar Aher) यांचा मृत्यू झाला. या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. (Industrialist murdered in nashik on Compony gate)

नाशिकमध्ये गेले काही दिवस हत्येचं सत्र सुरूच आहे, अंबड परिसरात एका उद्योजकाची हत्या करण्यात आली आहे.अवघ्या 20 दिवसात ८ हत्याच्या घटना समोर आल्या आहेत ,या घटनांनी शहर परिसरात भीतीचे वातवरण पसरले असून गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहिलाय की नाही असा प्रश्न सध्या सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे.

गेल्या २ दिवसात ३ जणांवर शहरात प्राणघातक हल्ले देखील झाल्याचे समोर आले आहे.अंबड एमआयडीसीत आहेर इंजिनियरिंग या कंपनीच्या गेट समोर कंपनी मालकावर अज्ञात तीन ते चार गुंडांनी धारदार शस्त्रांनी वार करीत पळ काढला. या हल्ल्यात नंदकुमार आहेर वय ५० रा. महात्मा नगर हे गंभीर जखमी झाले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात दाकळ केल्यावर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा दाखल झाला असून हल्लेखोरांचा शोध सध्या सुरू आहे.भर दिवसा हा खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण आहे,भर दिवसा अश्या प्रकारे खून झाल्याने पोलिसांचा देखील वचक हा गुन्हेगारांवर कुठे तरी कमी झालाय की काय असाच प्रश्न सध्या पडत आहे.

मंदिरांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकची ओळख ही गुन्हेगारी नगरी म्हणून होत चालली आहे या परिसरात सर्रासपणे अवैध धंदे देखील सुरू असल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे बोलले जाते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT