उत्तर महाराष्ट्र

परमवीर सिंग यांच्या नाशिकला समृद्धी महामार्गालगत बेनामी जमिनी?

समृद्धी महामार्गालगत या जमीनी आहेत. त्यामुळे त्याच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे.

Sampat Devgire

नाशिक : मुंबईचे पोलिस आयुक्त व वादग्रस्त अधिकारी परमवीर सिंग (Ex Mumbai police commissioner & Absconded officer Paramveer Singh) यांच्याशी संबंधीत व खंडणीच्या खटल्यातील सहआरोपी असलेल्या संजय मिश्रीलाल पुनुमिया (Sanjay Punumiya Co accuse on Ransom case related to paramveer singh) यांनी नाशिक परिसरात मालमत्ता खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. (Purchased lands sarroundin nashik) यासाठी पुनुमिया याने शेतकरी असल्याचा बनावट पुरावा जोडला आहे. त्यात परमवीर सिंग हे भागीदार असल्याचे बोलले जाते. परमवीर सिंग (Paramveer Singh) यांच्या या लींकमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान आज यासंदर्भात गुप्तचर विभागाने धामणगाव (इगतपुरी) येथे जाऊन प्रत्यक्ष जमिन पाहिली. समृद्धी महामार्गालगत या जमीनी आहेत. त्यामुळे त्याच्या दरात अचानक मोठी वाढ झाली आहे. या पथकाने नोंदणी व मुद्रांक विभागात त्याच्या कागपत्रांची चोकशी सुरु केली आहे. यासंदर्भात गेल्या महिन्यात एक निनावी तक्रार आली होती. त्यानुसार हा तपास केल्यावर परमवीर सिंग यांच्याशी संबंध असल्याचे चर्चा सुरु झाली. त्यात कितपत तत्थ्य आहे, याचा शोध गुप्तचर विभाग घेत आहे.

यासंदर्भात नोंदणी व मुद्राक विभागाच्या अधिकाऱ्याने संजय पुनुमिया यांनी या खरेदीचा दस्त नोंदविल्याचे मान्य केले. मात्र पुनुमिया यांच्या या व्यावहारात परमवीर सिंग यांचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. या खरेदीसाठी शेतकरी असल्याचा बनावट पुरावा सादर केला होता, हे आता उघड झाला याला देखील त्यांनी दुजोरा दिला.

सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय पुनुमिया हा सध्या तुरुंगात आहे. तो परमवीर सिंग यांच्याशी संबंधीत एका खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी आहे. त्याने नाशिक, सिन्नर, इगतपुरी येथे जमिनी खरेदी केल्याचे बोलले जाते. त्यातील इहतपुरी येथील जमिनीचा पोलिसांनी शोध घेतला. अन्य जमिनींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. त्याबाबत अद्याप विश्वासार्ह माहिती मिळालेली नसल्याचे कळते.

संजय पुनुमिया हा मुळचा ठाणे येथील निवासी आहे. त्याने पाथरे, मिरगाव (सिन्नर) आणि धामणगाव (इगतपुरी) येथे जमिनी खरेदी केल्याचे बोलले जाते. ही सर्व ठिकाणी समृद्धी महामार्गालगत आहेत. यातील एक जमिन खरेदी केल्यावर तेच पुरावे सिन्नर येथील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दुसऱ्या खरेदीची नोंदणी करताना केलेली आढळली. या जमिनींचे मूल्य कोट्यावधी रुपये आहे. त्यामुळे गुप्तचर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT