Chandrashekhar Bawankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Nashik News : उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याला पवार, ठाकरेंचे समर्थन आहे काय?

Sampat Devgire

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar: हिंदू धर्म व संस्कृतीविषयी तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेले वक्तव्य मान्य असल्याचे शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Election) तयारीचा भाग म्हणून भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) नाशिकच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भूमिकेवर टीका केली.

भाजपच्या लोकसभा महाविजय अभियानासाठी ते नाशिकमध्ये आले असताना माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत ५१ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळविण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यात पक्ष शंभर टक्के यशस्वी होईल.

ते म्हणाले, तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी तमिळनाडूमध्ये हिंदू धर्म व हिंदू संस्कृतीविषयी केलेल्या वक्तव्याला शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे समर्थन असावे, असे दिसते. त्यांना हे मान्य नसेल तर त्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांनी इंडिया आघाडी सोडावी. सत्तेच्या लालसेपोटी हिंदू धर्म व संस्कृती संपविण्याची भाषा करणाऱ्यांबरोबर ठाकरे व पवार मांडीला मांडी लावून कसे बसत आहेत.

भाजपचा ४५ प्लसचा नारा

लोकसभा निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा मिळविण्यासाठी महायुतीच्या आघाडीतील पक्षांशी बोलणे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कालखंडात तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मागील पाच वर्षांतील व शिंदे यांच्या सव्वा वर्षांच्या कार्यकाळातील लोकाभिमुख कामांची शिदोरी आम्ही जनतेसमोर घेऊन जात आहोत. राज्यात ४५ हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT