<div class="paragraphs"><p>Chhagan Bhujbal</p></div>

Chhagan Bhujbal

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

भाजपने छत्रपतींच्या आशिर्वादाचे असे पांग फेडले का?

Sampat Devgire

नाशिक : कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला. त्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सरकारची प्रतिक्रीया संतापजनक आहे. निवडणुकीआधी छत्रपतींचा आर्शिवाद म्हणून केलेल्या छत्रपतींचा आर्शिवाद अशी जाहिरातबाजी केली होती. त्याची अशा प्रकारे परतफेड केली का? असा संतप्त सावल सीमाप्रश्न समन्वयक मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला.

याबाबत ते म्हणाले, बंगळूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कन्नड गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. केंद्रातल्या भाजप सरकारने निवडणुकांच्या अगोदर 'छत्रपतींचा आशिर्वाद' असे म्हणत जाहिरातबाजी केली आता मात्र त्यांच्या सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का?. कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल.

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाहीतर संपूर्ण भारताचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही.

कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय. मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढायांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT