Governer Bhagatsingh Koshyari
Governer Bhagatsingh Koshyari Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज्यपाल हटवा ठराव करणारे `हे` ठरले राज्यातील पहिले गाव!

Sampat Devgire

नाशिक : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या विरोधातील वातावरण निवळण्याची चिन्हे नाहीत. आता हे लोण थेट ग्रामीण भागात पोहोचले आहे. जाखोरी (ता. नाशिक) (Nashik) या गावाने मंगळवारी बैठक घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवा असा ठराव केला. असा ठराव करणारे हे राज्यातील पहिले गाव असु शकतेे. (Jakhori is the first village passed resolution against Governer)

मंगळवारी जाखोरीच्या तरुण सदस्यांनी पुढाकार घेत ग्रामसंभा घेतली. त्यात जाखोरी ग्रामस्थाच्या बैठकीत कोश्यारी विरोधात निषेधाचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. लवकरच याबाबत ग्रामसभेतील ठराव म्हणून नियमानुसार पुढील प्रक्रीया करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य राहुल धात्रक यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी `छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुने जुने आदर्श झाले` असे वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांचा निषेध म्हणून राज्यपाल कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते त्रिवेदी यांच्या विरोधात राज्यभरात निषेध मोर्चे, जोडे मारो आदोंलन सुरु आहे.

नाशिक शहरासह आता ग्रामीण भागातही त्याचे लोण पसरले आहे. रोज विविध भागात आंदोलन व निषेध करून नागरिक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. जाखोरी (ता. नाशिक)गावात काल झालेल्या ग्रामसभेत देखील राज्यपालाच्या विरोधात निषेधाचा ठराव करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा जोडे मारो आंदोलन झाले. त्यानंतर राज्यपाल हटाव च्या घोषणा ग्रामसभेत देण्यात आल्या.

भाजपा जाणुन बुजून असे बेताल वक्तव्य करते. तसे प्रोत्साहन त्यांचे असते. त्यांच्या विचारसरणीचे नेते व पदावर विराजमान लोक महाराष्ट्रातील नागरिक व त्यांचे अराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून चाचपणी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आम्ही मोठे आहोत, असा गर्व त्यांना झाला आहे. त्याचा आम्ही ग्रामस्थ निषेध करत आहे. राज्यपाल हटवा आणि महाराष्ट्र वाचवा असे आमचे मत आहे, असे यावेळी सदस्यांनी सांगितले.

काल झालेल्या ग्रामसभेला सरपंच मंगला जगळे, उपसरपंच ज्योती पवार, सदस्य विश्वास कळमकर, राहुल धात्रक, तुकाराम चव्हाण, नितीन कळमकर, मधुकर पवार, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप कळमकर, रतन कळमकर, अरुण धात्रक, संदीप धात्रक, योगेश जाधव, दिनेश क्षिरसागर, रोशन जाधव, युवराज जगळे, अमोल मगर, केशव धात्रक, संतोष ताजने, सोपान कळमकर, सचिन जगळे, सिकंदर सय्यद, भाऊसाहेब कळमकर, जयराम क्षीरसागर, सुरेश विंचू, सोपान बोराडे आदीसह मोठ्या ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT