Jalgaon Crime News Today: मेहुना आणि शालक यांच्यातील नाजूक संबंध सर्वश्रुत आहेत. जळगावमध्ये लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी मेहुना आला. त्याने चक्क दरोडा टाकल्याने मेहुना आणि शालक यांची ही जोडी चांगलीच चर्चेत आली आहे.
अकोला येथील मुद्रांक उपनिबंधक तथा जिल्हाधिकारी पदावर किरण चौधरी हे कार्यरत आहेत. त्यांनी जळगाव येथील एका प्रकरणात तक्रारदाराला प्रचंड छळले. अडवणूक केल्याने त्रस्त झालेल्या या नागरिकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गाठले.
जळगाव एसीबी कडे तक्रार केल्यानंतर उपनिबंधक किरण चौधरी यांना दहा हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. मात्र या गुन्ह्यात वेगळाच वाद घ़डल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
पोलिसांच्या चौकशीत उपनिबंधक चौधरी यांनी त्यांचा जळगाव येथील फ्लॅटबाबत माहिती दिली. पोलिसांनी पुराव्यासाठी फ्लॅटचे झडती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बंद अवस्थेत असल्याने पोलिसांना झेडपी घेता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी तो सील केला.
लाच घेणाऱ्या निबंध चौधरी यांना वाचविण्यासाठी त्यांचा मेहुना मदतीला धावून आला. त्याने चक्क बंद असलेल्या फ्लॅट मधील पुरावे नष्ट करण्यासाठी मित्राची मदत घेतली. मेहुना प्रवीण अशोक महाजन आणि प्रसाद वसंत नारखेडे या दोघांनी गणेश कॉलनी येथील बंद फ्लॅटवर दरोडा टाकला.
बंद फ्लॅट मधील सोन्याचे दागिने आणि पुरावे असलेली फाईल त्यांनी चोरली. दरोडा टाकून मागच्या दरवाजाने बाहेर पडत असताना शेजाऱ्यांनी पाहिले. त्यातून हे सर्व बिंग फुटले. पोलिसांनी माहिती मिळताच तातडीने उपनिबंधक चौधरी याच्या मदतीला धावून आलेल्या मेहुना आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.
आता पोलिसांनी पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली मेहुना प्रवीण महाजन आणि त्याचा मित्र नारखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लाचखोर उपनिबंधक चौधरी यांच्या गुन्ह्यात आता पुरावा नष्ट करण्याचा नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या मेहुण्याला व त्याच्या मित्राला पोलीस आता सहआरोपी करणार आहेत.
लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकविण्याऐवजी कुटुंबीय मदत करतात हे नवे नाही. मात्र जळगाव येथील मेहुना आणि त्याचा मित्र यांनी चक्क लाचखोर अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी दरोडा टाकला. त्यामुळे हे मेहुणे आणि शालक चांगलेच चर्चेत आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.