Raksha Khadse slams officials over MLA priority issue Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha Khadse Politics: रक्षा खडसेंच्या संतापाचा स्फोट! अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर; आमदारांना महत्त्व, "खासदार उडत गेले का? "

Raksha Khadse statement on treatment of MPs: वीज वितरण कंपनीच्या कारभारावर अधिकाऱ्यांना मंत्री खडसे यांनी धरले धारेवर!

Sampat Devgire

Raksha Khadse News: केंद्र आणि राज्य शासनातील लोकप्रतिनिधींचा वाद नवा नाही. मात्र जळगाव जिल्ह्यात आमदार आणि खासदार दोन्ही भाजपचे आहेत. तरीही जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत हा वाद पहायला मिळाल्याने तो चर्चेचा विषय आहे. 

जिल्हा नियोजन समितीची बैठक जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या उपस्थित होत्या. जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांसह जिल्हाधिकारी आणि महापालिकेच्या आयुक्तांसह सर्व विभागांचे अधिकारी देखील या बैठकीत होते.

या बैठकीत जळगाव वीज वितरण कंपनीच्या खांबांचे स्थलांतर करण्याचा विषय चर्चेत आला. अधिकाऱ्यांनी या कामाची माहिती देण्यात सुरुवात केली. मात्र बैठकीत माहिती दिली जात असतानाच मंत्री खडसे यांनी त्यात हस्तक्षेप केला.

मंत्री खडसे यांनी या कामकाजाबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि मंत्री खडसे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.  वातावरण तापले आणि मंत्री खडसे यांनी अक्षरशा रौद्र अवतार धारण केल्याने अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.

या योजनेसाठी साठ टक्के निधी केंद्र शासनाकडून दिला जातो. योजना चांगल्या प्रकारे राबविली जावी यासाठी खासदार सातत्याने पाठपुरावा करतात. मात्र प्रशासन खासदारांची उपेक्षा करते. खासदारांना टाळण्याचे कारण काय?

या योजनांच्या उद्घाटनाला तुम्ही आमदारांना महत्त्व देता. आणि केंद्राचा निधी असूनही खासदार काय उडत गेले का? यापुढे असे प्रकार घडल्यास खपवून घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांची थेट लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करीन, अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

बैठकीतील वातावरण या विषयावरून अचानक तापले. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्येही चुळबुळ सुरू झाली. अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करीत, विषय अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न केला. संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना यापुढे लोकप्रतिनिधींची योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT