Varad BJP leaders joins Shivsena Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भाजपला खिंडार; ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनेचा भगवा

जळगाव जिल्ह्यातील वराड बुद्रुक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

Sampat Devgire

जळगाव : धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक (Varad Budruk) येथील उपसरपंच, माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (Joins Shivsena) यामुळे वराड येथे भाजपला भगदाड पडले असून ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

पालकमंत्री पाटील, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ व जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. या प्रवेशामुळे वराड येथे शिवसेनेचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सोमवारी अजिंठा विश्रामगृहात वराड बुद्रुक येथील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

भाजपला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केलेल्यांमध्ये उपसरपंच कल्पना सुरळकर, संदीप सुरळकर, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माधव सपकाळे, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन अर्जुन सुरळकर, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड, सुरेखा सोनवणे आदींचा समावेश आहे.

यावेळी जिल्हाप्रमुख भंगाळे, पंचायत समिती सभापती जनाआप्पा कोळी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, वावडद्याचे माजी सरपंच रवी कापडणे, शिरसोली माजी सरपंच अनिल पाटील, रमेश सोनवणे, शिवसेनेचे मुकेश सोनवणे आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT