Jalgaon DCC Bank Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon DCC Bank Election : रक्षा खडसे, मंगेश चव्हाणांना बिनविरोध करण्यात महाजनांना अपयश; दोन जागांवर रंगणार लढत!

BJP Fails to Get Raksha Khadse and Mangesh Chavan Elected Unopposed : भाजपच्या मंत्री गिरीश महाजन यांच्यासह ४ जागा बिनविरोध झाल्या. रक्षा खडसे, मंगेश चव्हाण यांना बिनविरोध करण्यात संकटमोचक गिरीश महाजन यांना अपयश आलं.

Ganesh Sonawane

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर या निवडणुकीत शिवसेनेच्या ६, भाजपच्या ४ तर राष्ट्रवादीच्या २ जागा बिनविरोध झाल्या. अशा महायुतीच्या एकुण १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासह, रोहित निकम, रजनी सावकारे, मधुकर राणे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, तसेच चाळीसगाचे आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध जागा काढण्यात संकटमोचक गिरीश महाजन यांना अपयश आले आहे.

त्यामुळे जळगाव जिल्हा बॅंकेत आता दोन प्रमुख लढती पाहायला मिळणार आहेत. मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) च्या देवयानी देशमुख यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तर दुसरी लढत चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण विरूध्द शिवसेना (शिंदे गटचे) विजय पाटील, नारायण पाटील यांच्यात होणार आहे. या महत्वपूर्ण दोन्ही लढतींकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

विशेषत:मुक्ताईनगरच्या जागेवरुन मोठा गुंता निर्माण झाला होता. चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरच्या जागेवर आपला हक्क सांगितला होता. दुसरीकडे भाजपला केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासाठी ही जागा हवी होती. या जागेवरुन भाजप व शिवसेनेत मोठी ताणाताणी झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरीस तोडगा न निघाल्याने या जागेवर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह महायुतीच्या नेत्यांकडून निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. नऊ जागांवर प्रत्यक्षात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात या दोन प्रमुख लढती होणार आहेत.

मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील हेही बिनविरोध

उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते तुकाराम विठोबा निकम यांनी आपला अर्ज मागे घेत गिरीश महाजन यांना पाठिंबा जाहीर केला. भाऊ फक्त तुमच्यासाठी म्हणत निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन हे जामनेर विकास सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध निवडले गेले.

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून बिनविरोध झाले. त्यांच्या विरोधातील तीन्ही उमेदवारांनी माघार घेतली. विशेषत: शिवसेना ठाकरे गटाचे नेते कुलभूषण पाटील यांनी माघार घेतल्याने चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT