Raksha khadse news: जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांमध्येच जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये मुक्ताईनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा खडसे फॅक्टर चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तालुका गटातून उमेदवार आहेत. त्यांना खडसे विरोधकांनी आव्हान दिले आहे. यामध्ये महायुतीचे नेतेच पडद्यामागे सक्रिय असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी विरोधकांना खडसावले आहे. प्रत्येक निवडणुकीत खडसे फॅक्टर चर्चेत आणून वादाचा आधार घेतला जातो. मात्र विरोधकांनी खडसे हे नाव बाजूला करून भाजपशी लढावे, असे आव्हान त्यांनी दिले.
जिल्हा बँकेत भाजप सहकारी पक्षाने बरोबर घेऊन महायुती म्हणून निवडणुकीत उतरला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे महायुतीचे नेते निवडणूक हाताळत आहेत. महायुती म्हणूनच सर्व उमेदवार प्रभावीपणे प्रचारात सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्हा बँकेत उर्वरित सर्व उमेदवार महायुतीचेच विजयी होतील. विरोधकांना कोणताही मुद्दा आणि स्थान नाही. केंद्र आणि राज्य सरकारने सहकार आणि सहकाऱ्यातील घटकांना विकासासाठी अनेक नियम आणि योजना आणल्या आहेत. त्याचा लाभ मिळविण्यासाठी महायुती निवडणूक जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप विरोधक नव्हे तर आघाडीतीलच काही नेते आरोप करीत आहेत. मात्र महायुतीचे नेते त्यातून मार्ग काढतील. केवळ जिल्हा बँक नव्हे तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील महायुती एकसंध पणे मतदारांना सामोरे जाऊन विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.