Satish Patil,Rohini Khadse, Gulabrao Deokar
Satish Patil,Rohini Khadse, Gulabrao Deokar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जळगाव जिल्हा बँक : सतीश पाटील, देवकर, खडसे विजयी ; सहकार पॅनलची बाजी

कैलास शिंदे

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank election) महविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे उमेदवार डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर,अँड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) विजयी झाल्या आहेत. राखीव सहा मतदार संघात सहकार पॅनलने बाजी मारली आहे.

इतर संस्था मतदार संघात सहकार पॅनलचे माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) विजयी झाले आहेत. त्यांना १५०१ मते मिळाली, इतर मागासवर्ग मतदार संघात सहकार पॅनलचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील विजयी झाले. त्यांना २३१६ मते मिळाली. त्यांचे विरोधी विकास पवार यांना २४२मते मिळाली, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून सहकार पॅनल चे श्यामकांत सोनवणे विजयी झाले आहेत. त्यांना २४६४ मते मिळाली.

व्ही.जे एन.टी मतदार संघात सहकार पॅनलचे मेहताब सिंग नाईक विजयी झाले. त्यांना २३२८ मते पडली. महिला राखीव मतदार संघात सहकार पॅनलचे उमदेवार विद्यमान चेअरमन अँड. रोहिणी खडसे व शैलजा निकम विजयी झाल्या आहेत. खडसे यांना २२३५ मते मिळाली तर निकम यांना १९२५ मते मिळाली आहेत.

जळगाव जिल्हा बॅंकेवर महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने आपला झेंडा फडकवला आहे. सहकार पॅनलचे २१ पैकी २० उमेदवार निवडून आले आहेत. तर एक अपक्ष उमेदवार भाजप चे आमदार संजय सावकारे अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाने बहिष्कार टाकला होता.

जळगाव जिल्हा बँक (Jalgaon District Bank election) संचालक निवडणुकीत रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात उलटफेर झाला माघार घेतलेल्या सहकार पॅनलच्या उमेदवार जनाबाई गोंडू महाजन या एका मताने विजयी झाल्या. ज्यांना पाठिंबा दिला ते अरुण पाटील पराभूत झाले.

दोन विविध कार्यकारी सोसायटीत महाविकास आघाडी प्रणित सहकार पँनेल विजयी झाले. तर भुसावळमध्ये भाजपचे आमदार अपक्ष उमेदवार संजय सावकारे विजयी झाले. एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) पुन्हा एकदा आपली ताकत सिद्ध केली आहे.

जळगाव जिल्हा बँक संचालक निवडणुकीचे आज मतमोजणी सुरू आहे. चार विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात महाविकास आघाडी प्रणित सहकार पँनेल विजयी झाले. रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघात सहकार पॅनल मधील उमेदवार जनाबाई गोंड महाजन यांनी जाहीर माघार घेऊन अपक्ष उमेदवार माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र उलटफेर होवून माघार घेतलेल्या सहकार पॅनल मधील जनाबाई महाजन या एका मताने विजयी झाल्या. त्यांना 26 मते मिळाली तर अरुण पांडुरंग पाटील यांना 25 मते मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT