MLA Kishor Patil, Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Bank Election: एकनाथ शिंदेंच्या आमदारानं 'अदृश्य' शक्तीचा डाव उधळला; भाजपची कोंडी! आमदार पुत्राचा अर्ज वैध

Sumit Patil's Nomination for Jalgaon District Bank Election Declared Valid: जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने पाचोरा गटातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निर्णयामुळे भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Sampat Devgire

Jalgaon Bank Election News: जळगाव जिल्हा बँकेच्या राजकारणाला आता नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. शिवसेना आणि भाजप पॅनल निर्मिती अंतिम टप्प्यात असतानाच पाचोरा गटातून शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

पाचोरा सोसायटी गटातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित यांचा अर्ज बाद ठरला होता. हा अर्ज बाद ठरल्याने आमदार पाटील यांनी भाजपवर नाव न घेता गंभीर आरोप केले होते. 'अदृश्य शक्ती' यामागे असल्यानेच अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपचे सतीश शिंदे यांचा एकमेव अर्ज राहिला होता. सतीश शिंदे यांच्या सोयीसाठीच पडद्यामागून सत्ताधारी नेते कार्यरत असल्याची चर्चा होती. मात्र आता उपनिबंधकांनी सुमित पाटील यांचा अर्ज वैध ठरविला आहे. त्यामुळे अदृश्य शक्तीने टाकलेला डाव उलटला आहे.

सुमित पाटील यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांची उमेदवारी निश्चित आहे. गटातील बहुतांशी मतदार आपल्या सोबत आहेत. सतीश पाटील यांना कोणत्याही मतदाराचा पाठिंबा नाही. त्यामुळे ते निवडणूक करू शकत नाहीत, अशा दावा आमदार किशोर पाटील यांनी केला होता.

दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात चर्चा होऊन पॅनल निर्मिती निश्चित झाली आहे. भाजपला अधिक जागा देत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष त्यांच्यासोबत गेला आहे. अशात मुक्ताईनगर मध्ये खडसे फॅक्टर तर पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील फॅक्टरमुळे या पॅनल निर्मितीच्या मार्गात मोठा अडसर निर्माण झाला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणूक माघारी साठी 16 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. सध्या दोन दिवस कार्यालयीन सुट्टी आहे. त्यामुळे पुढील चार दिवसात काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपचे उमेदवार सतीश पाटील यांची माघार होते की पाचोरा गटावरून पॅनल निर्मितीत अडथळा निर्माण होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT