<div class="paragraphs"><p>Election</p></div>

Election

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांनीही फुंकले निवडणुकीचे रणशिंग; उमेदवारांची घोषणा

कैलास शिंदे

जळगाव : तब्बल 35 हजार सभासद असलेल्या जळगाव (Jalgaon) जिल्हा सरकारी नोकरांच्या (ग. स.) सहकारी सोसायटीच्या संचालक निवडणुकीची (Election) अद्याप घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु प्रतिस्पर्धी गटांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. लोकमान्य गटाने आपले संभाव्य उमेदवार जाहीर केले आहेत.

जळगाव जिल्हा सहकारी नोकरांच्या सहकारी सोसायटीची संचालक पदाची मुदत संपली असून प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही, तो लवकरच जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. निवडणूक जाहीर झाली नसली तरी प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे.

रणांगणात सहकार, लोकमान्य, प्रगती व लोक सहकार हे गट आहेत. आणखी गट होण्याची शक्यता आहे. मात्र महत्वाच्या गटांनी आपल्या संभाव्य उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे. अनेकांच्या जिल्ह्यात दोन फेऱ्याही झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. सहकार गटाचे नेतृतव उदय पाटील हे करीत आहेत. तर लोकमान्य गटाचे नेतृत्व मगन पाटील, लोक सहकार गटाचे नेतृत्व मनोज पाटील आणि प्रगती गटाचे नेतृत्व रावसाहेब मांगो पाटील करीत आहेत.

लोकमान्य गटाने ही आता संभाव्य उमदेवार जाहीर केले असल्याचे मगन पाटील यांनी सांगितले. लोकमान्य गटाचे संभाव्य उमेदवार पुढीलप्रमाणे - विलास नेरकर (ओ बी सी), बाहेरील मतदार संघ : गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) (चाळीसगाव), विश्वास सूर्यवंशी (चाळीसगाव), सुनील निंबा पाटील (पाचोरा), योगेश इंगळे (यावल), संजय भानुदास पाटील (जामनेर), सुनील अमृत पाटील (पारोळा), विलास मोतीराम पाटील (पारोळा), संजय तुळशीराम भारंबे (भुसावळ), स्थानिक मतदार संघ-योगेश नंनवरे, अनिल मगन टील, महिला राखीव जागृती शरद पवार (Sharad Pawar) (पारोळा), चित्रा नामदेव पाटील साळुंखे (चोपडा).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT