Eknath Khadse News: नगरपालिका निवडणुक प्रचार जोमात सुरू आहे. महायुतीने या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर प्रचार दौरा करीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी भाजपचे विविध मंत्री उपस्थित होते. भाजपने या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांसह भाजपच्या विविध नेत्यांनी जळगाव जिल्ह्यात लक्ष घातले आहे. या निवडणुकीसाठी सर्व तंत्र वापरण्याच्या सूचना त्यांनी केले आहेत. त्यामुळे भाजपचे सर्व नेते नगरपालिका निवडणुकीत झोकून देऊन प्रचार करीत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती सरकारचा आगामी प्लॅन या निमित्ताने मतदारांपुढे मांडला. लहान शहरांच्या विकासासाठी आपण स्वतः लक्ष घातले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि महिलांसाठी लाडकी बहिण योजना लाभदायी ठरत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मात्र या प्रचारावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना घेतले आहे. मी पस्तीस वर्ष राजकारणात आहे. मात्र असा प्रचार आणि प्रकार कधी बघितला नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापर्यंत मर्यादित होते. कोणताही मुख्यमंत्री नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्याचे माझ्या पाहण्यात नाही. मात्र आता भाजपने वेगळेच प्रकार सुरू केले आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवा पायंडा पाडला आहे. हा पॉईंट त्यांच्या पक्षासाठी चांगला आहे. भाजपाला तो लाभदायी देखील ठरू शकतो. मात्र असे यापूर्वी कधीही घडलेले नाही.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भुसावळ नगरपालिका प्रचारासाठी सभा घेतली. याचा अर्थ भाजपला निवडणूक सोपी नाही याचा अंदाज आला असावा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यापूर्वी त्यांनी हलक्यात घेतले होते.
भुसावळ नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांमध्ये संघर्ष आहे. या निवडणुकीची धास्ती भाजपला निर्माण झाली असावी. निवडणुकीच्या बाबत धडकी भरल्यानेच मुख्यमंत्र्यांना भुसावळ शहरात प्रचारासाठी यावे लागले, असा त्याचा अर्थ निघतो.
एकनाथ खडसे यांना त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांनी डिवचले होते. आमदार मंगेश चव्हाण यांनीही खडसे यांच्यावर टीका केली होती. भाजपने केलेल्या या टीकेला माजी मंत्री खडसे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट करून उत्तर दिले.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.