Jalgaon Politics News: जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्योग विभागाने जळगावला ‘डी प्लस’ औद्योगिक झोनचा दर्जा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग उभारणी, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या निर्णयाची माहिती देत महायुती सरकारच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचा दावा केला आहे.
जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारा मोठा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. संदर्भात उद्योग विभागाने ही घोषणा केली आहे. त्यामुळे रोजगार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल. पाटील यांनी याबाबत माहिती दिली. गेले काही वर्ष सातत्याने जळगावच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्नशील होतो. यासंदर्भात मोठे यश हाती लागले आहे. त्यामुळे महायुती सरकारचा हा निर्णय जळगावला लाभदायी ठरेल, असे पालकमंत्री म्हणाले.
जळगाव जिल्ह्याला औद्योगिक विभागाने आज डी प्लस झोन हा दर्जा बहाल केला. हा महत्त्वाचा हा निर्णय होण्यासाठी पाठपुरावा यशस्वी झाला. त्यामुळे राज्यातून नवे औद्योगिक प्रकल्प उभे राहण्यास चालना मिळेल.यापूर्वी विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे यांसारख्या भागांप्रमाणे जळगावच्या औद्योगिक विकासासाठीही विशेष प्रोत्साहनाची गरज व्यक्त केली जात होती. आता ‘डी प्लस’ दर्जामुळे जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल. औद्योगिक दृष्ट्या हा परिसर मागे असल्याने नवीन गुंतवणूक होत नव्हती. गुंतवणूकीतील हा अडथळा आता दूर झाला आहे.
'डी प्लस झोन' हा दर्जा मिळाल्याने नवीन उद्योग स्थापन करण्यास शासनाचे अनुदान आणि अन्य सवलतींचा मोठा लाभ मिळतो. प्राप्तिकर, योगी कर, बँकांच्या पतपुरवठ्यातील व्याजात सवलत आणि गुंतवणुकीवर अनुदान या स्वरूपात उद्योगांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे नवे उद्योग उभे राहतील. रोजगार उपलब्ध होईल. युवकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. असे गुलाबराव पाटील म्हणाले.
जळगावच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. गेले काही वर्ष जळगावच्या औद्योगिक विकासासाठी प्रयत्न यशस्वी होण्यात हा मोठा अडथळा होता. माहिती सरकारने त्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.