Jalgaon EVM News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News: EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही अचानक बंद; उमेदवाराच्या फोननंतर प्रशासनाला आली जाग

Jagdish Patil

Jalgaon Lok Sabha Election 2024: जळगावमधून (Jalgaon) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे इथेल ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे CCTV डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद पडल्याची घटना घडली. तर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही बंद झाले होते.

याबाबतची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी दिली. तर डिस्प्ले बंद झाल्यानंतर सर्व ठिकाणच्या 36 कॅमेऱ्यांचं फुटेज उपलब्ध असून सीसीटीव्ही बंद असतानाच्या काळातील व्हीडिओ शूटिंग उपलब्ध असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

तर या घटनेची माहिती महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार (Karan Pawar) यांनी फोनवरुन कळवली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला. आज रविवारी सकाळी 9 ते 9.04 मिनिटाच्या काळात ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले अचानक बंद पडले. याबाबतची माहिती समोर येताच लगेच हा वीज पुरवठा सुरळीक करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जळगाव-रावेर लोकसभा मतदारसंघातील (Jalgaon-Raver Lok Sabha Constituency) मतदान नुकतंच पार पडलं. या मतदारसंघात जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार तर महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्या लढत झाली. दोघांपैकी मतदार कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ घालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

तर याच मतदारांनी दिलेला मतांचा कौल सध्या ईव्हीएम मशीनमध्ये कैद असून चार जूनला या मशीनमधील मतांची मोजणी होणार आहे. त्याआधी या मशीनवर पहारा ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम तयार करण्यात आल्या आहेत. याच स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही बंद पडल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, आता सर्व सीसीटीव्ही पूर्ववत सुरु करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT