Gulabrao Patil effort fails in Jalgaon MLC election sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon MLC Election : जळगावात गिरीश महाजनांचे शिलेदार रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी, विरोधी उमेदवाराला फक्त 17 मते

Nandkishor Mahajan Registers One-Sided Victory in Jalgaon : जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे नंदकिशोर महाजन मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. विरोधी उमेदवाराला केवळ १७ मते मिळाली आहेत.

Ganesh Sonawane

Jalgaon MLC Election : जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांचे शिलेदार भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा मोठा विजय झाला आहे.

मतमोजणीला सोमवारी (दि. २२ ) सकाळी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरुवात झाली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात थेट लढत झाली. नंदकिशोर महाजन यांना ५२८ मते मिळाली तर विरोधी उमेदवार शरद तायडे यांना केवळ १७ मते मिळाली. ५११ मतांनी नंदकिशोर महाजन यांचा विजय झाला.

या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दोन्ही गटाकडून विजयाचे दावे केले जात होते. मात्र, प्रत्यक्षात नंदकिशोर महाजन यांनी पूर्णपणे एकतर्फी ही निवडणुक जिंकली. मतमोजणी प्रक्रियेत अगदी प्रारंभीपासूनच महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी आघाडी घेतली होती. त्यांना पहिल्याच फेरीत तब्बल ५७७ मतांचा आकडा गाठता आल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाची मते न मोजताच विजयी घोषीत करण्यात आले. विधान परिषदेच्या निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांनी एकतर्फी विजय संपादन केल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

पाहा कुणाला किती मतदान पडले.

जळगाव विधान परिषद

---

एकूण मतदान : ६३०

झालेले मतदान : ६१६

अवैध मते : ०५

विजयासाठी आवश्यक कोटा : ३०६

---

नंदकिशोर महाजन : ५८२

शरद तायडे : १७

अनिल चौधरी : ११

रेश्मा काळे : ०१

या निवडणुकीत शिवसेनेच्या अपक्ष उमेदवार रेश्मा काळे यांनी बंडखोरी केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन त्यांनी माघार घेतली. या निवडणुकीत रेश्मा काळे यांना केवळ १ मते पडली आहे. याचाच अर्थ त्यांनी महायुतीचा धर्म पूर्णपणे पाळला.

तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनीही निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी माघार घेतली होती. त्यांना केवळ ११ मते पडली आहेत. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना भाजप, शिवसेना शिंदे गट आणि मित्रपक्षांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांचा मोठा विजय झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT