Gulabrao Deokar, Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Deokar : माजी मंत्री गुलाबरावांना राष्ट्रवादीत घेण्यास पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध, कार्यालयाबाहेर लावले प्रवेशबंदीचे फलक

Jalgaon NCP Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन होताच विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Jagdish Patil

Jalgaon News, 10 Dec : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. नवीन सरकार स्थापन होताच विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

शिवाय शिवेसना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (NCP) विरोधातील अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी आपण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना (Sunil tatkare) भेटल्याचंही देवकर यांनी सांगितलं आहे. मात्र, देवकरांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची वाट स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे बिकट झाली आहे. कारण माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रवेशाला अजितदादांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.

ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी देवकरांना पक्षात प्रवेश न देण्याची भूमिका घेतली आहे. शिवाय एवढ्यावरच न थांबता पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगावातील पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुलाबराव देवकर व त्यांच्या समर्थकांना प्रवेश बंदी केल्याचा फलक लावला आहे. या फलकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवाय देवकर यांनी अजित पवारांविरूध्द गलिच्छ भाषा वापरली आहे. यामुळे त्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येवू देणार नाही. त्यांना पक्षात घेतल्यास आम्ही जिल्हाभर आंदोलन करू, असा इशाराही महाजन यांनी यापूर्वीच दिला आहे.

तर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गुलाबराव देवकर यांना जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शरद पवार गटाने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत देवकरांचा दारूण पराभव झाला.

या पराभवानंतर राज्यात महायुतीची सत्ता येताच देवकरांनी समर्थक व कार्यकर्त्यांकडून आग्रह होत असल्याचे कारण आपण अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, देवकरांच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध करत आता महायुती सत्तेत आल्यामुळे अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्यांना आमचा विरोध असेल अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT