Vaishali Patil ; KIshor Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News : वैशाली पाटील यांचा भाऊ आमदार किशोर पाटलांवर घणाघात; शिवसेनेने इतकं देवूनही खंजीर खुपसलं...

Uddhav Thackeray In Jalgaon : शिवसैनिक धगधगते योद्धे आहेत, उद्याचा सुर्योदय आपलाच आहे,

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray In Jalgaon : जळगावमधील पाचोऱ्यात आज (दि.२३ एप्रिल) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये चांगलच राजकारण तापलं आहे. ठाकरे गट आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगलंच राजकारण तापलं होतं.

"संजय राऊतांनी चौकटीत बोलावं अन्यथा सभेत घुसणार'', असा इशारा राज्याचे मंत्री व शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांनी दिला होता. त्यानंतर संजय राऊतांनीही त्यांना चॅलेंज देत सभेत घुसून दाखवा, असं म्हटलं होतं. यानंतर आता ज्यांच्यासाठी ही सभा आयोजित केली होती, त्या ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली पाटील यांनी, शिंदे गटाचे आमदार व आपले बंधू किशोर पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

वैशाली पाटील म्हणाल्या, 'आज माझ्यासाठी आनंदाचा आणि वेदनाचा असा संमिश्र दिवस आहे. आज आपल्या सोबत तात्यासाहेब नाहीत, याचं दुखं आहे. पण त्यांचं स्वप्न पूर्ण होतंय, याचा आनंद आहे." तात्यासाहेब निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जगले, तात्यासाहेब कुठे असतील आज उद्धव ठाकरेंची सभा पाहून आनंदी झाले असतील. शिवसैनिक धगधगते योद्धे आहेत, उद्याचा सुर्योदय आपलाच आहे, भगवी पहाट उगवल्याशिवाय राहणार नाही," असे पाटील म्हणाल्या.

'पाचोरा तालुक्यात पहिला शिवसेनेचा आमदार तात्यासाहेबांच्या रूपात मिळाला. या ही नंतर आमच्या घरामध्ये पुन्हा आमदारकी बहाल करण्यात आली. शिवसेनेने आमच्या घराला इतकं देवूनही घरातील काहींनी कृतघ्नता केली, ही कृतघ्नता कशासाठी? तात्यासाहेब आज असते तर त्यांनी हे सहन केलं असतं का? बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली असती का? उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसलं असतं का?" अशा शब्दात त्यांनी आपले बंधू आमदार किशोर पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT