Sexual Assault sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Crime : जळगाव हादरलं ! झेडपीच्या शाळेत चौथीतील विद्यार्थिनीवर अत्याचार ; आईच्या तक्रारीवरून नराधम शिक्षकाला अटक

Jalgaon Teacher Arrested in POCSO Case : सकाळी दहा वाजता 'शाळेत झाडू मारण्यासाठी ये' असा बहाणा करून शिक्षकाने विद्यार्थीना बोलावून घेतलं. शाळेत कुणी नसल्याचे पाहून नराधम शिक्षकाने तिच्यासोबत नको ते कृत्य केलं.

Ganesh Sonawane

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशियत शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून धरणगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी आपल्या कुटुंबासह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते. तसेच स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक मराठे हा विद्यार्थिनीला शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी सुमारे दहा वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घेत असे व नको ते कृत्य तिच्यासोबत करत असे.

सकाळी शाळेत कुणी नसल्याचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करत असे. इतकेच नव्हे तर तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा लैंगिक छळ करत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

विद्यार्थिनीने घडलेली बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

मागील दोन वर्षापासून अत्याचार

धक्कादायक म्हणजे, हा शिक्षक मागील दोन वर्षांपासून सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याचं पीडितीने तीच्या पालकांना दिलेल्या माहितीनुसार पुढे आलं आहे. धरणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत घडलेला हा प्रकार आहे. पीडित विद्यार्थीनी या शाळेत इयत्ता तिसरीत शिकत असताना या नराधमाने तिच्यावर नजर ठेवली होती. शाळेची वेळ होण्यापूर्वी सकाळी बरोबर १० वाजता 'शाळेत झाडू मारण्यासाठी ये' असा बहाणा करून त्याने चिमुकलीला एकांतात बोलावून घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला. (Jalgaon Crime )

पुढे हा नराधम शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने पीडित विद्यार्थीनी इयत्ता चौथीमध्ये गेल्यानंतरही तिचा छळ करणे सुरुच ठेवले. तिला वर्गात बोलावून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवणे आणि तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करणे त्याने सुरु ठेवले. पीडितेने या कृत्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तिला मारहाण करुन 'कोणाला काही सांगितले तर तुझे आई-वडील मरून जातील' अशी भीती तिला घातली.

अगदी 30 एप्रिल 2026 रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशी देखील या नराधम शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केला. सततच्या छळाला कंटाळून पीडित विद्यार्थीनेने अखेर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तातडीने धरणगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपी नंदलाल मराठे (रा. द्वारका नगर, जळगाव) याच्याविरुद्ध पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT