जळगांव : राज्यातील (Maharashtra) राजकीय घडामोडींत जळगावचे नाव पुढे आले आहे. जिल्ह्यातील पारोळा येथील चिमणराव पाटील (Chimanrao Patil) आणि पाचोरा येथील किशोर पाटील (Kishor Patil) हे दोन आमदार बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमवेत गेल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत दोन्ही आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. (Shivsena`s two MLA with rebel Eknath Shinde)
राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले. त्यांच्या समवेत विविध आमदार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार संकटात आले आहे. या सर्व घडामोडींत अनेक आमदार बेपत्ता आहेत.
जळगाव जिल्हा देखील यानिमित्ताने चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांचे काका आर. ओ. तात्या पाटील हे कट्टर शिवसेना आमदार होते. त्यांनी आपली आमदारकीची जागा किशोर पाटील यांना दिली होती. पाचोरा पालिकाही किशोर पाटील यांच्या ताब्यात आहे. पाटील हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे ते त्यांच्या समवेत आहेत, असे कळते.
पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील यापूर्वी मंत्रीपदाचे दावेदार होते. मात्र गुलाबराव पाटील हे मंत्री झाल्याने त्यांची संधी हुकली. त्यामुळे ते नाराज होते. अनेक वेळा शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी त्यांचे उघड वादही झाले. त्यामुळेच ते फुटले असावे असा अंदाज आहे.
....
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.