Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil On State Government: अदानीसाठी राज्य सरकार धोरण कसे बदलते?

Jayant Patil Criticized State Government: जयंत पाटील यांची टिका, माझ्या फाईलवर नऊ मुख्यमंत्र्यांनी सह्या केल्या आहेत, तरी परवानगी का मिळत नाही.

Sampat Devgire

Alibaug Port issue : मी मराठी माणुस आहे. पहिले खाजगी बंदर उभारण्याचा प्रस्ताव मी दिलेला आहे. गेली बावीस वर्षे त्यासाठी लढतो आहे, मात्र परवानगी मिळत नाही. मात्र एका दिवसात उद्योगपती अदानी यांच्यासाठी सरकारचे धोरण कसे बदलते? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केला. (Jayant Patil a Marathi man fighting for his port permission from last 22 years)

`शेकाप`चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उद्योग विभागाच्या `मैत्री` या बीलावरील चर्चेत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडे अत्यंत गंभीर प्रश्न केला. अदानी यांच्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) एका दिवसात धोरण बदलले असा आरोप त्यांनी केला.

या बीलावरील चर्चेत श्री. पाटील म्हणाले, सरकार एक खिडकी योजनेलाच `मैत्री` नावाने नवीन बील म्हणून सादर करीत आहे. त्यात सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळणार असल्याचे सांगते. मात्र खरेच तसे होईल का?. कारण ही वन विंडो कधी उघडतच नाही. ती नवी देखील नाही.

ते म्हणाले, राज्यातील पहिले बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव मी दिला. एका बाजूला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, दुसऱ्या बाजूला रेल्वे आहे. तुम्ही पॉलीसी ठरवता मग ती बदलता कशी?. गेली २२ वर्षे त्या पोर्टच्या लॅंड हस्तांतरणाची फाईल फिरतेच आहे. त्यावर नऊ मुख्यमंत्र्यांच्या सह्या झाल्या आहेत. मात्र अदानी, रिलायन्स यांच्या फाईल्स लगेच क्लीअर कशा होतात. मराठी माणूस एक बंदर उभारतो आहे. हा प्रकल्प एव्हढा रखडतो कसा, असा प्रश्न त्यांनी केला.

श्री. पाटील म्हणाले, सरकार जे धोरण ठरवते ते किमान दहा- पंधरा वर्षे तरी राहिले पाहिजे. ते धोरण लगेच कसे बदलते?. अदानी आल्यावर धोरण कसे बदलते?. त्यात सोयीचे बदल कसे होतात?, असा गंभीर प्रश्न करीत त्यांनी राज्य सरकारवर टिका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT