NCP leader Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जयंत पाटील सिद्धार्थ जाधवच्या केसांच्या फुग्यावर हात फिरवतात तेव्हा!

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दाक्षिणात्यांच्या प्रेमाचे कौतुक केले.

Sampat Devgire

नाशिक : दक्षिणेकडील राज्यात कलावंतांना देवाप्रमाणे मानतात इतके की त्यांना मुख्यमंत्री (Chief Minister) करतात. मराठी माणूस मराठी माणसांना मोठं करण्यात कमी पडतो अशी खंत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केली.

नाशिकमध्ये पार पडलेल्या सुविचार पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री. पाटील, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि पोलिस आयुक्त दिपक पांडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवर व अभिनेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

जलसंपदामंत्री जयंत पाटील हे भाषणासाठी उभे राहीले. भाषणाला सुरूवात करतांना त्यांनी अभिनेता सिध्दार्थ जाधव याचे कौतुक केले. तसेच जाधव यांनी आपण दिसायला फार चांगले नाही असा उल्लेख केला हा धागा पकडत आपण दिसायला चांगले नाहीत असे कोण म्हणतो आपण जी हेअर स्टाईल केली आहे तिचे मला फार आकर्षण वाटते असे सांगत आपल्या केसावर जो फुगा आला आहे त्याला मला हात लावूशी वाटतो असे सांगताच सिध्दार्थ जाधवनेही आपल्या जागेवर उठून पाटील यांच्याकडे धाव घेतली यावेळी सिध्दार्थच्या केसावरील फुग्याला जाधव यांनीहात लावताच सभागृहात एकच हशा पिकला.

श्री. पाटील यावेळी म्हणाले, आयुष्यात निर्मळ मनाने केलेले कार्य यशास प्राप्त ठरते. कारकिर्दीत प्रामाणिकपणा आणि जिद्द यांची सांगड घातल्यास कोणतेही काम अवघड नाही. दिसण्यावर काहीच नसतं तर माणसाच्या असणं महत्वाचे आहे. व्यासपीठावरील मराठी कलाकारांचा गौरव करतांना त्यांनी सांगितले की, दक्षिणेकडे अभिनेत्यांना मुख्यमंत्री करतात परंतू आपण आपल्या माणसांना मोठ करण्यात कमी पडतो. आपण प्रेम, व्देष राखून करतो. परंतू खरेपणाने यश नक्कीच मिळतं.

यावेळी अभिनेते डॅा अतुल वडगावकर, सिध्दार्थ जाधव, पुजा सावंत, अभिनेते चिन्मय उदगीरकर या पुरस्कार सोहळयाचे प्रमुख आकर्षण ठरले. मान्यवरांच्या यावेळी अभिनेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सुविचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

--

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT