Left front News: शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी डाव्या चळवळीतील त्रुटी आणि अडचणी यावर आपले मतप्रदर्शन केले आहे. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाचा देशाच्या राजकारणात विस्तार होण्यासाठी डाव्या चळवळीची कोणती चूक कारणीभूत ठरली हे सांगितले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन नुकतेच येथे झाले. या निमित्ताने डाव्या चळवळीतील विविध घटक पक्षांनी शुभेच्छा दिल्या. वेळी 'शेकाप'चे नेते जयंत पाटील यांनी आपले परखड मतप्रदर्शन केले. सध्याच्या भारतीय जनता पक्षाकडून राज्यात विरोधी पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यात डाव्या चळवळीची जबाबदारी वाढली आहे.
आणीबाणीच्या कालावधीत सर्वाधिक संघर्ष डाव्या चळवळीच्या नेत्यांना करावा लागला. अनेक संकटांना आपले नेते सामोरे गेले. त्याच्या आठवणी अद्यापही ताज्या आहेत. याच कालावधीत देशात 'जनता पक्षाचा' प्रयोग झाला. भाजपने पहिल्यांदाच सरकारमध्ये आल्यावर त्याचा लाभ उठवला. त्यामुळे तो प्रयोग डाव्या चळवळीला महागात पडला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
आणीबाणीनंतर देशभर उभारलेल्या चळवळीत जयप्रकाश नारायण यांचा वाटा होता. त्यांनी सर्वांनी पंधरा दिवसात पक्ष विसर्जित करून जनता पार्टीत सामील होण्याचे आवाहन केले होते. डाव्या चळवळींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. मात्र जनसंघ त्यात सामील झाला.
जनता पक्षाच्या सरकारमध्ये जनसंघाला सामील करणे ही सगळ्यात मोठी चूक होती. सरकारमध्ये सामील झाल्याने जनसंघ आणि पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील सर्व संवैधानिक संस्थांमध्ये आपली विचारधारा असलेले लोक सामील केले. त्यानंतर जनसंघ बरखास्त करून भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली.
सध्या देशभर भाजपच्या विस्ताराला आणीबाणीच्या काळात डाव्यांनी केलेली ती चूक कारणीभूत ठरली आहे. आज भाजप गरीब आणि कामगारांविरुद्ध काम करीत आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या संस्था मोडीत काढायच्या आहेत. मोजक्या भांडवलदारांसाठी भाजप काम करीत आहे.
भाजपचे सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सध्या अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने भांडवलदारांचे हित जोपासण्यासाठी काम करीत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी डाव्या चळवळीने वर्गीय संघटना बळकट केल्या पाहिजे. आपण कोणत्या मतदारसंघात निवडून येऊ शकतो याचा विचार करून भावी काळात काम करावे. आपल्या हातात चार वर्ष असल्याने महाराष्ट्रातील मोजके मतदार संघ निवडून तेथे चळवळीचा विस्तार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.