Mangesh Chavan,Unmesh Patil, Jalgaon DCC Bank Election  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

JDCC Bank Election : चाळीसगावात बंडखोरांच्या बूथवर पोहोचले उन्मेष पाटील, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी महायुतीत तणाव

Unmesh Patil at Rebel Candidates' Booth in Chalisgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या मतदानादिवशी चाळीसगावात महायुतीमधील राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. चाळीसगावात उन्मेष पाटील बंडखोरांच्या बूथवर हजेरी लावल्याने वाद चव्हाच्यावर आला आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी चाळीसगाव सोसायटी मतदारसंघात शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांच्या बुथवर शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील थांबून असल्यामुळे महायुतीमधील तणाव वाढला आहे.

चाळीसगाव सोसायटी मतदारसंघात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे गटाच्या) दोन उमेदवारांनी माघार न घेतल्याने निवडणूक होत आहे. या बंडखोरीमागे उन्मेष पाटील यांची भूमिका असल्याची चर्चा आधीपासून होती. मात्र, निवडणूक प्रक्रियेदरम्यान फारसे सक्रिय न दिसलेले उन्मेष पाटील मतदानाच्या दिवशी बंडखोरांच्या बूथवर उपस्थित राहिल्याने या चर्चेला नव्याने हवा मिळाली आहे.

महायुतीत सहभागी असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याची बंडखोर उमेदवारांच्या बूथवरील उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला आहे. मंगेश चव्हाण यांच्या विरोधात शिंदे गटातीलच उमेदवार मैदानात असल्याने चाळीसगावमधील राजकीय संघर्ष आणि युतीतील नाराजी मतदानाच्या दिवशी उघडपणे दिसून येत आहे.

चाळीसगावमध्ये उन्मेष पाटील बंडखोर उमेदवाराच्या बूथवर असल्याच्या मुद्द्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जागावाटपावरून नाराजी होती, हे मान्य आहे. मात्र, काही जणांनी बंडखोरी केली असली तरी आम्ही महायुतीचा धर्म पाळला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नाराजी असण्याचा अर्थ महायुतीच्या बाहेरील उमेदवाराला मतदान करणे असा होत नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले. महायुतीमध्ये कुरबुर असली तरी अन्य उमेदवाराला मतदान केले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. याआधीही गुलाबराव पाटील यांनी उन्मेष चव्हाण म्हणजे शिवसेना नाही असे म्हटले होते.

अशी आहे लढत

चाळीसगावचे भाजपचे महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरूध्द शिवसेना (शिंदे गटचे) बंडखोर उमेदवार विजय पाटील व नारायण पाटील यांच्यात लढत होणार आहे. या महत्वपूर्ण लढतीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे. मंगेश चव्हाण यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT