Nashik Crime News AI Image
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime News : नाशिकच्या 'गजवा ए हिंद' प्रकरणात हलगर्जी ; महिला तपास अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, पोलीस आयुक्तांचा दणका

Nashik assault case : एका महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करत तीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. या अंतिसंवेदनशील केसमध्ये तपास करताना हलगर्जी केल्याने पोलिस आयुक्तांनी महिला तपास अधिकाऱ्याची बदली केली.

Ganesh Sonawane

Nashik Crime : नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत हिंदू महिला कर्मचाऱ्यांचा लैगिंक छळ व धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार ताजा असतानाच, असाच काहीसा एक दुसरा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये एका अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीसोबत घडला आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल असून संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी तंजिर इनामदारची न्यायालयाने नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे.

नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात संशयित आरोपी व पीडित तरुणी शिक्षण घेत होती. सुरुवातीला तरुणीला संशयिताने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर जबरदस्तीने दारू पाजून व सिगरेट प्यायला सांगून ती नशेत असताना तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. एवढच नाही तर तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करत तिच्या धार्मिक भावना दुखावल्या. संशयित आरोपीने तरुणीला एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे 'गजवा-ए-हिंद'चे पालन करण्यास सांगून धर्मांतरासाठी प्रचंड दबाव टाकला.

संशयिताने पीडित तरुणीची धार्मिक ओळखीवरच घाव घातला. तिच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा त्याने तोडून टाकला. तिच्या शरीरावर त्याने चावा घेत हे 'लव्ह बाईट' असल्याचे सांगत तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला वारंवार लॉजवर नेले आणि बळजबरीने शारीरिक अत्याचार केले.

या गुन्ह्याचा तपास पंचवटीच्या पोलिस निरीक्षक ज्योती आमणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परंतु या अतिसंवेदनशील प्रकरणात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत तपासी अधिकारी महिला पोलिस निरीक्षक ज्योती आमणे यांची तडकाफडकी आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

नेमकं काय झालं?

याप्रकरणाचा तपास करताना ज्योती आमणे यांनी पीडित तरुणीला चौकशीदरम्यान आक्षेपार्ह प्रश्न विचारले. पीडित तरुणीने त्यासंदर्भात तक्रार केली असता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचवटीच्या सहायक आयुक्तांनी पीडितेचा लेखी जबाब नोंदवून घेतला. त्यात गंभीर बाबी निदर्शनास आल्याने आयुक्तांनी महिला पोलिस निरीक्षक ज्योती आमणे यांच्याकडील तपास काढून घेत त्यांची आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात बदली केली. या गुन्ह्यात तपास पोलिस आयुक्तांनी दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपविला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT