Kalpana Kharat Bail | Land Fraud Case | Nashik Court Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kalpana Kharat Bail : भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला कोर्टाचा मोठा दिलासा, अटक टळली

Kalpana Kharat Land Fraud Case : न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना अटी शर्ती लागू केल्या आहेत. कल्पना खरातला पोलिसांच्या गुन्ह्याशी संबंधित तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे कडक निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Jagdish Patil

Kalpana Kharat Bail : भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिला न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणात नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार कोपळकर यांनी कल्पना खरातला 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.

त्यामुळे आता कल्पना खरातला हा मोठा दिलासा मिळाला आहे. अशोक खरातचे कारनामे उघडकीस आल्यानंतर कल्पना खरात फरार झाली होती. अनेक दिवस पोलिसांनी तपास करूनही पोलिसांना ती सापडली नाही. शिवाय अशोक खरात प्रमाने तिच्याविरोधातही अनेक नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

तर आपणाला अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी आधीही कल्पना खरातने कोर्टाला विनंती केली होती. मात्र, याआधी कोर्टाने तिला जामीन अर्ज फेटाळला होता, मात्र, आता कोर्टाकडून सशर्त जामिन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, सदर जमिनीचा व्यवहार 2004 मधील असून तक्रारदार शिवराम माळी यांनी तब्बल 22 वर्षांनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रदीर्घ कालावधीत फिर्यादी किंवा त्यांच्या भावांनी खरेदीखत रद्द करण्यासाठी किंवा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कधीही दिवाणी न्यायालयात दाद मागितली नसल्याची बाब न्यायालयाने नोंदवली.

शिवाय करार करताना फसवणुकीचा कोणताही अप्रामाणिक हेतू असल्याचे तपासात समोर आलं नसल्याचं मतही न्यायालयाने व्यक्त केलं. हा व्यवहार नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे अधिकृतरीत्या झाला असून, केवळ दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचा रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं.

दरम्यान, न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताना अटी शर्ती लागू केल्या आहेत. कल्पना खरातला पोलिसांच्या गुन्ह्याशी संबंधित तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे कडक निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. तर दुसरीकडे सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अशोक खरात विरोधातील दोन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

या प्रकरणांची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. अशोक खरातविरोधात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत त्याच्याविरोधात एकूण 17 गुन्ह्यांची नोंद असून, त्यापैकी 12 प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT