Ashok Kharat_Kalpana Kharat 
उत्तर महाराष्ट्र

Kalpna Kharat: गुन्हा दाखल झाल्यानंतर अशोक खरातची पत्नी फरार! मुलगा ताब्यात; शोधासाठी दोन पथकं रवाना

Ashok Kharat Case: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याचा पाय आता आणखी खोलात गेला असून एसआयटीच्या पथकानं त्याच्या नाशिक येथील घरुन त्याच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे.

Amit Ujagare

Ashok Kharat Case: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याचा पाय आता आणखी खोलात गेला असून एसआयटीच्या पथकानं त्याच्या नाशिक येथील घरुन त्याच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर खरातची पत्नी कल्पना खरात यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्या फरार झाल्या आहेत. त्यांच्या शोधासाठी दोन पथकं नाशिक आणि इतर भागात रवाना झाली आहेत.

शिर्डी पोलिसांत कल्पना खरात यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस कल्पना खरातच्या घरी पोहोचले आहेत. पण त्या घरी सापडलेल्या नाहीत फरार झाल्या आहेत. खरात यांच्या अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर असून यासाठी दोन पथकं नाशिक आणि पुण्याच्या दिशेनं रवाना झाली असल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, खरात कुटुंबियांविषयी काहीही माहिती नसल्याचं तसंच सध्या ते कुठे आहेत याची कल्पना नसल्याचं त्यांच्या बंगल्यावरील वॉचमननं सांगितलं आहे.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात डॉक्टरांपाठोपाठ एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडीकल स्टोअरही पोलीस यंत्रणेच्या रडारवर असल्याची माहिती मिळते आहे. संबंधित सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती का? असा पोलिसांना संशय आहे. एका विशिष्ट मेडीकल स्टोअरमधून गुंगीची औषधं, वेदनाशामक आणि इतर काही गोळ्या-औषधं खरेदी केली जात होती, अशी माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याचं सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT