Jalgaon Lok Sabha Constituency 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Unmesh Patil: उन्मेष पाटलांच्या खेळीनंतर जळगावात कोणाचा होणार गेम?

Jalgaon Lok Sabha Constituency 2024: उन्मेश पाटील यांनी चाणाक्ष खेळी करत आपले मित्र करण पवार याना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला अगदी सोपी असलेली ही निवडणुक अवघड झाली.

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News: भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी बंड करून पक्ष सोडला. ठाकरे गटात प्रवेश करून त्यांनी आपल्या मित्राला खासदारकीची उमेदवारी देवून भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यांचा हा निर्णय योग्य होता की अयोग्य याचा निकाल उद्या (ता ४)लागणार आहे.

भारतीय जनता पक्षाने काही विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली. त्यात जळगाव येथील खासदार उन्मेष पाटील यांचाही सामावेश होता.काही खासदारांनी आपल्या पक्षाचा निर्णय मान्य करून शांत राहणे पसंत केले.

जळगाव येथील खासदार उन्मेष पाटील यांनी थेट बंड करून पक्षाला निवडणूकीत आव्हान दिले. त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्ष ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांचे जिवलग मित्र पारोळा येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश केला.

उन्मेश पाटील यांनी चाणाक्ष खेळी करत आपले मित्र करण पवार याना लोकसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला अगदी सोपी असलेली ही निवडणुक अवघड झाली. भाजपने माजी आमदार स्मिता वाघ याना उमेदवारी दिली. शिवसेना ठाकरे गटाकडे टक्कर देईल असा उमेदवार नव्हता परंतु उन्मेष पाटील यांच्या बंडामुळे भाजप समोर कडवे आव्हान उभे राहिले.

दोन्ही उमेदवारात जोरदार लढत झाली आहे. त्यामुळे जो उमेदवार विजयी होईल तो कमी लीडने विजयी होईल अशी चर्चा आहे. मात्र या विजयामुळे भाजप विरुद्ध केलेल्या विद्यमान खासदाराच्या बंडाचा निकाल लागेल. महाराष्टात भाजपच्या एकमेव विद्यमान खासदाराने पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावून पक्षाला आव्हान दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT