Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

जातीय सलोखा, एकता बिघडू देऊ नका!

Sampat Devgire

येवला : देशात जातीधर्मात (Religious) भेद निर्माण करून देशाला (Nation) दिशाहीन करण्याचे षडयंत्र रचले जात असून यामुळे देशातील जातीय सलोखा बिघडत असल्याची खंत पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली. सद्या देशातील महागाई शिगेला पोहोचली असून विकासाचे मुद्दे बाजूला सारुन धार्मिक राजकारणावर (religious politics) भर दिला जात आहे. मात्र हे षडयंत्र हाणून पाडत सर्व धर्मियांनी आपल्यातला सलोखा कायम ठेवा, बिघडू देऊ नका असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

पवित्र रमजानचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील पट्टण मशीद प्रांगणात ईफ्तार पार्टी झाली, त्यावेळी भुजबळ बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर काजी सलीमोद्दीन मिसबाही होते.

‘प्रत्येक धर्म हा प्रथम माणुसकीची शिकवण देतो. सर्वधर्म समभाव राखण्यासाठी धर्मगुरुंनी देखील प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही मत भुजबळांनी व्यक्त केले. समता परीषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशात बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचा व न्याय देण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला आहे. गेल्या पंधरा वर्षापासून तालुक्याचे नेतृत्व करताना प्रत्येक समाज घटकाना न्याय देत त्यांनी मतदारसंघात खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित केली आहे.

त्याचबरोबर भरगच्च निधी आणून येवल्याला वैभव प्राप्त करून दिले आहे. यामुळे शहरासह तालुक्यात विकासाची अनेक कामे झाली असल्याचे विचार शहर काजी सलीमोद्दीन मिसबाही यांनी मांडले. निवृत्ती चव्हाण महाराज यांनी असे सलोखा व शांतीसाठी कार्यक्रम घेण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस व मुस्लीम समाजाने याकामी पुढाकार घेतल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. श्री. भुजबळ, आमदार दराडे यांनी इफ्तार पार्टीत सहभाग घेतला.

या वेळी शिक्षक आमदार किशोर दराडे, निवृत्ती चव्हाण महाराज, सेंट जाँन चर्चचे डिकन पिटर सुधाकर काळे, कोटमगाव येथील जगदंबा देवस्थानचे पुजारी गुरु रवींद्र जोशी, भन्ते भारव्दाज, मौलाना ईस्माईल नदवी, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव दिलीप (अण्णा) खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस व मुस्लीम समाजातर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT