Ketki Chitale Latest Marathi News
Ketki Chitale Latest Marathi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

केतकीची डोकेदुखी वाढली; नाशिकच्या दुर्गम भागात गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सध्या पोलिस कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्याभोवती अडचणींचा फास अधिकाधिक आवळला जात आहे. (Crime News)

केतकीच्या विरोधात नाशिक युवक काँग्रेस (Congress) जिल्हाध्यक्ष मानस पगार (Manas Pagar) यांच्या तक्रारीवरून नाशिक जिल्ह्यातील बाऱ्हे पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी (ता.18 मे) सांयकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकीला पवारांबद्दल सोशल मीडियावर (social media) केलेलं बदनामीकारक लिखाण चांगलचं महागात पडले असून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिचा मुक्काम सध्या पोलीस कोठडीत आहे. (Ketki Chitale Latest Marathi News)

केतकी विरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत त्यात आता नाशिकमधून पुन्हा एका गुन्ह्याची भर पडली आहे. मानस पगार यांनी केतकी विरोधात तक्रार केली होती. यावर काल सांयकाळी नाशिक जिल्ह्यातील बाऱ्हे पोलीस स्टेशन, ता. सुरगाणा येथे गुन्हा नोंदवला गेला आहे. जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागात गुन्हा दाखल झाल्याने केतकीच्या डोकेदुखीत आणखी भर पडली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, ठाणे क्राईम ब्रांचने केतकीवर आयटी अॅक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल केला असून काल केतकीला ठाणे सत्र न्यायालयात (Court) हजर करण्यात आले होते. ठाणे न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, काल पुन्हा न्यायालयाने केतकीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे तिचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

केतकी विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर खालच्या भाषेत टीका करणे खपवून घेणार नाही, असा इशाराच राष्ट्रवादीने दिला आहे. तर राज्यात ठिकाणी केतकीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने संबंधित पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा मागितला जाऊ शकतो. त्यामुळे केतकी चितळेला आणखी काही न्यायलयीन कोठडीत राहण्याची शक्यता आहे. आता येत्या काही दिवसांत पोलीस केतकी विरोधात कोणते नवे पुरावे सादर करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT