Eknath Khadase Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon news: 'खडसे जेलमध्ये जाणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; भाजप आमदाराने स्पष्टच सांगितलं...

जळगावात जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी राजकारण तापलं आहे.

कैलास शिंदे :सरकारनामा ब्युरो

Eknath Khadse News : जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरापर्यंत आला आहे, त्यामुळे त्यांचा शेवटचा थयथयाट सुरू आहे. यांना जेलमध्ये जाण्यापासून शिवाय कोणताही पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असा दावा भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यानी केला आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीमुळे आरोपाच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत. जिल्हा दूध संघात प्रशासकपदी असतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी गैरव्यवहार केला असून त्याप्रकरणी फिर्याद दाखल करावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी शुक्रवार(ता.९) होणार असल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्याला भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे, की एकनाथ खडसे यांचा हा जावईशोध आहे, वास्तविक हा गैरव्यवहार त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अध्यक्ष असतांनाच घडला आहे, या प्रकरणी गुन्हा दाखल होवून कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना अटक झाली होती. त्यांनी सुध्दा पोलीसांच्या जबाबात गुन्हा कसा घडला याची माहिती दिली आहे.

मुलाची शपथ घेतो, गैरव्यवहार केला नाही

एकनाथ खडसे हे नेहमी काहीतरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप करीत असतात. परंतु आपण जिल्हा दूध संघात तब्बल ३२ दिवस मुख्यप्रशासक होतो, मात्र या काळात आपण एकही पैशाचा भ्रष्टाचार केला नाही,आपण आपल्या मुलाची शपथ घेवून सांगतो, मी जर भ्रष्टचार केला असेल तर आमच्यावर संकट येतील.

खडसेंनी अनेकाना संपविले

एकनाथ खडसे हे अत्यंत नेहमीच आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी असे आरोप करीत असतात, असे सागूंन आमदार चव्हाण म्हणाले, त्यांनी सुरेशदादा जैन, ॲड.रविंद्र भैय्या पाटील, बाळासाहेब चौधरी यांच्या विरोधात असेच सनसनाटी आरोप करून त्यांना राजकारणात संपविण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासारख्या मराठा बहुजनालाही त्यांचा संपविण्याचा प्रयत्न आहे, परंतुआपण त्यांना घाबणार नाही.

मला ‘ईडी’ची नोटीस

एकनाथ खडसे यांनी आपल्याविरूध्द अनेक तक्रारी केल्या आहेत, माझ्या बायकोविरूध्दही त्यांनी तक्रारी केल्या आहेत. मला सुध्दा ‘इडी’ची नोटीस आली आहे, त्याला आपण उत्तरही दिले आहे. आपला जमीनी खरेदी व बांधकामाचा व्यवसाय त्यातून आपण कमाई केली आहे. आपण कोणाचाही पैसा बुडविलेला नाही.

खडसे यांनी आपण पैसा बुडविलेला एक व्यक्ती आणून दाखवावा आपण त्यांची जाहिर माफी मागण्यास तयार आहोत. मात्र त्यांनी जिल्हा दूध संघात नोकरभरतीसाठी घेतलेल्या पैशाचा पुरावा म्हणून अनेक जण त्यांच्या मुक्ताईनगरातील दारात उभे करू शकतो. तसेच खडसे यांना आपण जाहिर ईशारा देतो कि, त्यांनी एका व्यासपीठावर येवून आपल्याशी चर्चा करावी आपण त्यांना पुराव्यासह सर्व सिध्द करून दाखवू. आपली खडसे नावाविरूध्द नव्हे तर वृत्ती विरूध्द लढाई आहे, ती आपण लढून ही वृत्ती संपविणार आहोत, जिल्हा दूध संघाचा गैरव्यवहार खडसे यांच्य दाराशी आला आहे. त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावेच लागले ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT