Kiran Gosavi sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ड्रग्ज पार्टी प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावीचे चाळीसगाव 'कनेक्शन'

कुझ ड्रग्ज पार्टी (mumbai drug party case) प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण प्रकाश गोसावी (kiran gosavi) यांचे चाळीसगाव कनेक्शन समोर आले आहे.

कैलास शिंदे

जळगाव : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी (kiran gosavi) याला पुणे पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांच्याविरोधात फसवणुकीच्या तीन तक्रारी पोलिसांकडे दाखल आहे. मलेशिया येथे नोकरीचे आमिष दाखवून पुण्यातील चिन्मय देशमुख यांची गोसावीने फसवणूक केली होती. अन्य ठिकाणीही गोसावीविरोधात नोकरीचे आमिष दाखवून फसवून केल्याच्या तक्रारी दाखल आहेत.

कुझ ड्रग्ज पार्टी (mumbai drug party case) प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण प्रकाश गोसावी (kiran gosavi) यांचे चाळीसगाव कनेक्शन समोर आले आहे. तो पिलखोड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असून त्याला पोलिसांनी फरार घोषित केल्यानंतर तो त्या काळात आपल्या गावी पिलखोड येथे येऊन गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

पुणे पोलिसांनी किरण गोसावी यास अटक केल्यानंतर पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत गोसावी हा फरार असलेल्या काळात जळगाव जिल्ह्यात येवून गेल्याचे सांगितले होते. त्यानंतर जळगाव जिल्ह्यात त्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली, तो जळगाव जिल्हातील चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील मूळ रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे कुटुंब ठाण्यात राहते, गोसावी यांचे मोबाईल लोकेशन पिलखोड व पातोडा येथे दिसून आल्याने पुणे पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर चाळीसगाव पोलिस कामाला लागले. मिळालेल्या माहितीनुसार मेहरुणबारे पोलिस ठाण्याचे सहय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले व हेमंत शिंदे यांनी सर्व परिसर पिजुन काढला, तर पतोंडा येथे चाळीसगाव शहर पोलिसांनी त्यांचा शोध घेतला, मात्र तो आढळला नाही. किरण गोसावी हा चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील रहिवासी असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.

याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत माहिती दिली.अमिताभ गुप्ता म्हणाले, ''किरण गोसावी यांच्याविरोधात २०१८ मध्ये पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून त्याला शोध पुणे पोलिस घेत होती. त्याला फरारी म्हणून घोषित करण्यात आले होते. मागील दहा दिवसापासून किरण गोसावीला शोधण्यासाठी पनवेल, जळगाव, लोणावळा, लखनो येथे पुणे पोलिसांचे पथक गेले होते. सचिन पाटील या नावाने किरण गोसावी हा वावरत होता.'' ''किरण गोसावीवर अन्य ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत. त्याचा अन्य तपास यंत्रणांनी ताबा मागितला तर त्याची प्रक्रिया केली जाईल,'' असे गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

आर्यन खान ड्रग्ज पार्टीतील पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने किरण गोसावीवर (kiran gosavi) गंभीर आरोप केल्यानंतर आज किरण गोसावीने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले. ''प्रभाकर साईल याचा सीडीआर रिपोर्ट तपासा, त्यातून कोणा किती पैसे घेतले हे स्पष्ट होईल,'' असेही गोसावी म्हणाला.

प्रभाकर साईलने जो व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्याबाबत किरण गोसावी म्हणाला, ''प्रभाकर साईल जे आरोप करतो आहे. एवढे पैसे घेतले, तेवढे पैसे घेतले आहे. पण सॅम डिसुझासोबत संभाषण कुणाचे झाले आहे, किती पैसे कुणी घेतले, प्रभाकर साईलला पाच दिवसात काय ऑफर आल्या आहेत. हे त्यांच्या मोबाईलवरुन तुम्हाला स्पष्टपणे समजेल. माझी माध्यमांना एवढीच विनंती करतो प्रभाकर साईल आणि त्याचे दोन्ही भाऊ यांचे सीडीआर रिपोर्ट, त्यांचे मोबाईल चॅट काढावेत, माझे मोबाईल चॅट काढा. मी कुठे बोललो आहे हे स्पष्ट होईल.''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT