Kisan Sabha long March
Kisan Sabha long March Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Long March; शासनाच्या आश्वासनानंतर लाँग मार्च स्थगित!

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) शेतकरी, आदिवासींच्या (Trible) विविध मागण्यासाठी मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघालेला मोर्चा थांबवून यशस्वी तोडगा काढण्याच्या दिशेने आज सरकारने (Government) पावले टाकली. मुंबईत मुख्यमंत्री (Eknath Shinde), उपमुख्यमंत्र्यांच्या (Devendra Fadanvis) उपस्थितीत झालेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर शासनाने सहमती दर्शवल्याने लाँग मार्च स्थगित करण्यात आला. (State Government assures Kisan sabha on there deemands)

आज दुपारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह संबंधीत मंत्री तसेच किसान सभेच्या नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चा झाली. त्या चर्चेनंतर लाँग मार्च जीथे आहे तीथेच थांबेल असे ठरले.

मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील, अतुल सावे, पालकमंत्री दादा भुसे आदी मंत्री होते. लाँग मार्चचे नेते डॉ. अशोक ढवळे, डॉ. डी. एल. कराड, माजी आमदार जे. पी. गावित, उदय नारकर, डॉ. अजित नवले, इरफान शेख, उमेश देशमुख, अर्जुन आडे, श्रीमती मंजुळा आदी उपस्थित होते.

यावेळी किसान सभेच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. त्याबाबत संबंधीत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील चर्चा झाली. त्यानंतर सकारात्मक चर्चेत प्रमुख प्रश्न सोडवण्यात यश आले. चर्चेतील मुद्यांचे इतिवृत्त उद्या विधीमंडळात सादर केले जाईल. त्यावरील मान्यतेनंतर संबंधीत खात्यांच्या सचिवांना दिले जाईल. त्यानंतर त्याचे लिखीत पत्र हाती पडल्यावर लाँग मार्च नाशिकला परत जाईल. तोपर्यंत सध्या वाशिंद येथे मुक्काम असल्याने तीथेच आदिवासी, शेतकरी व कार्यकर्ते थांबतील अशी माहिती डॉ. कराड यांनी `सरकारनामा`ला दिली.

यासंदर्भात काल विधान परिषदेत मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबत निवेदन केले होते. त्यात मार्च थांबावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी स्वतः मोर्चाला समोर जावून शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहे. ज्या मागण्या तातडीने मान्य करणे शक्य आहे, त्या जागेवरच मान्य केल्या जातील. पायी चालत येणाऱ्या शेतकरी, आदिवासी बांधवांना मुंबईत यावे लागू नये, असाच आमचा प्रयत्न असल्याचे उत्तर दिले होते.

शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पाँईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता. जयंत पाटील यांनी दोन दिवसांपासून हजारो शेतकरी, आदिवासी बांधव नाशिकहून चालत येत आहेत. मात्र अद्याप सरकारने यावर निवेदन केले नाही. याआधी असाच लाँग मार्च काढण्यात आला होता. त्यांच्या मागण्यांबाबत आश्वासन दिले होते. यापुर्वी सरकारच्या वतीने दिलेली आश्वासने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसेंनी पाळली नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT