Wet Drought Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`ओला दुष्काळ` प्रश्नावर किसान सभा करणार आरपार लढा!

Sampat Devgire

नाशिक : अखिल भारतीय किसान सभेचे (Kisan Sabha) २३वे महाराष्ट्र (Maharashtra) राज्य अधिवेशन येत्या ३१ ऑक्टोबरपासून अकोले (नगर) (Ahemadnagar) येथे होणार आहे. तीन दिवसीय अधिवेशनाची सुरुवात जाहीर सभेने होईल. याद्वारे ओला दुष्काळाच्या प्रश्नावर (Issue of Drought in the state) राज्यव्यापी आरपार लढ्याचे नियोजन या अधिवेशनात करण्यात येणार आहे. (Farmers serious issue of crop loss will adress by Kisan Sabha)

राज्य अधिवेशनापूर्वी किसान सभेची राज्यभर रीतसर गाव, तालुका व जिल्हा अधिवेशने घेण्यात आली आहेत. जिल्हा अधिवेशनांमध्ये निवडलेले ३०० प्रतिनिधी व किसान सभेचे ७१ राज्य कौन्सिल सदस्य तीन दिवसांच्या या अधिवेशनासाठी अकोले येथे उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकरी व श्रमिकांच्या विविध प्रश्नांबाबत राज्यव्यापी लढ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी घेतलेले संपूर्ण कर्ज सरकारने माफ करावे व शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी सहाय्य म्हणून प्रति एकर ५० हजार रुपये भरपाई द्यावी, पीक विमा कंपन्यांनी अग्रिम भरपाई व विमा भरपाई द्यावी, दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, उसाला एफ.आर.पी. अधिक २०० रुपये एकरकमी द्यावेत, सर्व पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणारा कायदा करावा, दारिद्र्यरेषेच्या यादीत पात्र लाभार्थींचा समावेश व्हावा आदी मागण्यांवर विचारमंथन होईल.

वनजमिनी कसणारांच्या नावे कराव्यात, हिरड्याची सरकारी खरेदी सुरू करून हिरड्याला रास्त भाव द्यावा, श्रमिकांना घरकुल, रेशन व वृद्धापकाळ पेंशन द्यावे, रस्ते, कोरीडॉर, धरणे, रेल्वे, हायवे, विमानतळ आदी विकासकामांसाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकऱ्यांना २०१३च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे भरपाई व पुनर्वसन द्या या मागण्यांसाठी राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा होईल.

अकोले येथील सभेत डॉ. अशोक ढवळे, पी. कृष्णप्रसाद, माजी आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले, अर्जुन आडे, उमेश देशमुख हे प्रमुख वक्ते असतील.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT