Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela Politics: कुंभमेळ्यातील वृक्षतोडीच्या निर्णयानं भाजपच्या संकटमोचकाला घेरलं; नाशिककरांनी जळगाव करू नका, असं थेट सुनावलं!

Kumbh Mela Tree Cutting Row: शहरातील सतराशे झाडे तोडण्यावर नागरिकांनी घेतले तीव्र आक्षेप, अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी.

Sampat Devgire

BJP facing backlash over Kumbh Mela decisions: साधूग्राम वसविण्यासाठी सतराशे झाडे महापालिका तोडणार आहे. हा निर्णय महापालिकेच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. याबाबत हजारो नागरिक एकत्र आल्याने तो चर्चेचा विषय आहे.

तपोवन आतील सतराशे झाडे तोडण्यात येणार आहेत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्याचे समर्थन केले होते. हे समर्थन त्यांना अडचणीचे ठरणार आहे. या संदर्भात काल सामाजिक कार्यकर्त्यांनी कुंभमेळा मंत्री महाजन यांना चांगलेच सुनावले. नाशिकचे जळगाव करू नका. आमचे नाशिक नाशिकच राहू द्या, या शब्दात त्यांना सुनावण्यात आले.

तपोवन आतील सतराशे झाडे तोडण्याबाबत नाशिक महापालिकेची जाहीर सुनावणी काल झाली. ज्या सभागृहात सुनावणी झाली तो गच्च भरला होता. असंख्य सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमींनी गर्दी केली होती. शेकडो प्रश्नांच्या सरबतीने अधिकाऱ्यांची अक्षरश: तारांबळ उडाली.

या अधिकाऱ्यांना त्यांनी नेमप्लेट लावली नाही यावरून उपस्थितांनी फैलावर घेतले. सतराशे झाडे तोडण्याबाबत अंतिम निर्णय होण्याआधीच कुंभमेळा मंत्री यांनी निर्णय जाहीर कसा केला?. प्रशासन याबाबत तयारी करून बसले आहे का?. असा प्रश्न उपस्थितांनी केला.

कुंभमेळा मंत्री महाजन यांनी जळगाव शहराची काय अवस्था केली, हे सगळ्यांना माहित आहे. आता नाशिकचे जळगाव करू नये. जिथे दहा पट झाडे लावणार आहे त्या जागेवर कुंभमेळा घ्यावा, असे यावेळी उपस्थितानी सुनावले.

यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र बागुल, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश गीते, सचिव मसूद जिलानी, निरंजन टकले, भातपचे सचिव राजू देसले, निशिकांत पगारे, देवांग जानी, रोहन देशपांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम चव्हाण, रोशन केदार आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी लिखित व जाहीर स्वरूपात झाडे तोडण्यास विरोध केला.

साधूग्राम उभारण्याच्या ठिकाणी असलेली जागा सातत्याने कमी होत आहे. तिथे बांधकामे केली जात आहेत. मंगल कार्यालय उभारली जात आहेत. त्यावेळी महापालिका प्रशासन गप्प का बसले? तीनशे एकर जागा गिळंकृत झाली, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न पत्रकार निरंजन टकले यांनी उपस्थित केला.

विविध पर्यावरण प्रेमी आणि तज्ज्ञांनी यावेळी सरकारचे धोरण आणि कुंभमेळा अधिकारी यांच्या कामकाजाविषयी गंभीर आक्षेप नोंदवले. या अधिकाऱ्यांना नाशिक शहराच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक स्थितीची जाणीव नाही.

त्यांनी अशा स्वरूपाचे निर्णय घेऊन शहराला संकटात ढकलू नये, या शब्दात पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला. त्यामुळे झाडे तोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाबरोबरच कुंभमेळा मंत्री महाजन यांनाही अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT