Kunal_Patil, Rohidas Patil & Devendra Fadanvis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kunal Patil Politics; कुणाल पाटील म्हणतात, वडील रोहिदास पाटील यांनीही भाजप प्रवेशाला विरोध केला नसता!

Kunal Patil;Lack of visionary team in Congress, need to go with the flow for development -भाजप प्रवेश करतात कुणाल पाटील यांनी केली भाजपच्या कार्यशैलीची तोंड भरून स्तुती

Sampat Devgire

Kunal Patil News: धुळे जिल्ह्याच्या राजकारणात गेली ७५ वर्ष पाटील कुटुंब काँग्रेसच्या सत्तेबरोबर राहिले आहे. याच कुटुंबातील माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकताच भाजप प्रवेश केला. हा प्रवेश धुळे जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांना अपेक्षित वाटत होता.

माजी आमदार कुणाल पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. काँग्रेसच्या प्रवाहात आणि सत्ते सोबत राहिलेले वडील व माजी मंत्री (कै) रोहिदास पाटील हयात असते तर त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाला विरोध केला नसता.

https://www.sarkarnama.in/topic/bjp

धुळे जिल्ह्यात काँग्रेस नेते (कै) रोहिदास दाजी पाटील यांनी अनेक जलसिंचन प्रकल्प उभे केले. विकासाच्या अनेक योजना आणल्या. आजही तेथील नागरिक विविध प्रकल्पांबाबत पाटील यांचा आवर्जून उल्लेख करतात. परिसराच्या या विकासाची गती कमी होऊ नये, म्हणूनच आपण प्रवाहासोबत अर्थात भाजप पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पोर्टी मध्ये काम केलेल्या कुणाल पाटील यांनी यावेळी राहुल गांधी यांच्या विषयी धक्कादायक विधान केले. राहुल गांधी यांच्याकडे सामान्य आणि गोरगरिबांचे कल्याण व्हावे अशी दृष्टी आणि धडपड आहे. मात्र एकटा माणूस ते करू शकत नाही. काँग्रेसमध्ये विकासाची दृष्टी आणि नियोजन असलेली टीम नाही. टीम शिवाय हा पक्ष फार काळ मोठी कामे करू शकणार नाही, असा दावा पाटील यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कोर्टी मध्ये पाटील यांचा समावेश होता. त्या दृष्टीने त्यांना राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर काम करण्याचे संधी होती. सध्या ते प्रदेश कार्याध्यक्ष होते. नेतृत्व अर्थात पक्षाला पुढे नेण्याची जबाबदारी असलेल्या नेत्यानेच पक्षावर विजन असलेली टीम नसल्याचा आरोप करणे, हा चर्चेचा विषय आहे.

धुळे ग्रामीण या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे भाजप पक्षात प्रवेश केल्याने राजकीय भवितव्य काय? यावर पाटील म्हणाले, आमदार किंवा खासदार होणे म्हणजेच सर्व काही नव्हे. परिसराचा विकास करण्यासाठी प्रवाहाबरोबर राहणे देखील एवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण भाजप पक्षात आलो आहोत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये काम करणे आपल्याला आवडेल, असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची तोंड भरून स्तुती केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता आज तरी अन्य कुठे उपलब्ध नाही. त्यांच्याकडे राज्याच्या विकासाचे मोठे व्हिजन आहे. परिसराचा विकास व्हावा याची धडपड आहे, असे पाटील म्हणाले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT