Ladki Bahin Yojana Fraud Complaint: सरकार येताच, लाडकी बहीण योजनेचे अनुदान 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. आता राज्यात महायुती सरकार आले असून, शंभर दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे.
तरी देखील लाडकी बहीण योजनेचे अनुदान वाढवलेले नाही. राज्यातील लाडक्या बहिणींची महायुती सरकारने फसवणूक केल्याची तक्रार शेतकरी महिलांनी अहिल्यानगरमधील श्रीरामपूर पोलिस ठाण्यात केली आहे.
महायुती सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार देताना, गुन्हा नोंदवण्याची मागणी शेतकरी महिला सुनिता वानखेडे, कोमल वानखेडे यांनी केली.
शेतकऱ्यांनी कर्जमाफीवरून दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. श्रीरामपूर पोलिसांनी शेतकरी महिलांचा तक्रारी अर्ज दाखल करून घेतला असून, पुढं काय कारवाई होणार का? याकडे आता लक्ष लागलं आहे.
महायुतीने (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होते की, सरकार येताच माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये दर महिना अनुदान देऊ, पणं निवडून सत्तेत येताच महायुतीने 2100 रुपये तर नाहीच दिले. पणं किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांचे 1500 रुपये अनुदानही बंद केले. आता फक्त 500 रुपये प्रति महिना देण्याचे जाहीर केले आहे.
म्हणजेच, लाडक्या बहिणींना 2100 रुपये पणं नाही, अन् 1500 रुपये पणं नाही. आता 500 रुपये देऊन आमची फसवणूक केली आहे, अशी तक्रार शेतकरी महिलांनी महायुती सरकारविरुद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यात केली. संघटीत गुन्हेगारी, फसवणूक, विश्वासघात करणे असे मुद्दे तक्रारीत दाखल केले आहेत. कर्जदार शेतकरी नवनाथ दिघे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी यांनी पण फसवणुकीची तक्रार केली आहे.
श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हे दाखल न केल्यास शेतकरी संघटना नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकरी आणि लाडक्या बहिणी 5 मे रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयात संघटनेचे राज्य उपाध्यक्ष वकील अजित काळे यांचेमार्फत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.