जळगाव : समाज टिकवायचा असेल, तर नाते जपायला शिका. भविष्याच्या दृष्टीने सकल लेवा समाजाची एकजूट महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी केले.
भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील ‘अमृतयोग सोहळा’ पाडळसे (ता. यावल) येथील लोक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी भवनात झाला. त्याप्रसंगी श्री. खडसे बोलत होते. यानिमित्त सकल लेवा समाज लेवा अधिवेशनानंतर पुन्हा एकत्र आला होता.
श्री. खडसे म्हणाले, गुणवंतांना पाठबळ द्या. त्यांचे मनापासून कौतुक करा, असे सांगून लेवा भोरगाव पंचायतीचे कार्य अत्यंत स्पृहणीय आहे.
कुटुंब नोंदणी अभियान सुरू
लेवा पाटीदार समाजाच्या चौथ्या महाधिवेशनाचा अहवाल सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला. सकल लेवा समाज आयोजित कुटुंब नोंदणी अभियानाचा प्रारंभ कुटुंबनायक रमेश पाटील यांच्या हस्ते झाला. कुटुंबनायक पाटील यांना अमृत योग गौरव समितीतर्फे मानपत्र देण्यात आले. गौरव समितीचे मुख्य संयोजक विष्णू भंगाळे यांनी प्रास्ताविक आणि अहवाल वाचन केले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, जळगावचे महापौर जयश्री महाजन, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर, डॉ. उल्हास पाटील, लेवा पंचायतचे युवा अध्यक्ष ललितकुमार पाटील, आमदार संजय सावकारे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आमदार दिलीप भोळे, सावदाच्या नगराध्यक्षा अनिता येवले, सभापती पल्लवी चौधरी, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, पोपटतात्या भोळे, प्रभात चौधरी, अमृतयोग गौरव समिती व नियोजनाची महत्त्वाची धुरा सांभाळणारे कलावंत तुषार वाघुळदे आदी उपस्थित होते.
यावेळी पुणे, मुंबई, धुळे, मध्यप्रदेश, गुजरात, बुलडाणा, मलकापूर, नांदुरा, मोताळा, नांदेड, साळवा, वाघळी, डोंबिवली, औरंगाबाद आदी भागातून समाजबांधव उपस्थित होते.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.