Local Made Gun Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

तरुणीच्या दुचाकीत सापडला चक्क गावठी कट्टा!

नाशिकमध्ये रिया पटवर्धन या तरूणीच्या दुचाकीच्या डिक्कीत गावठी कट्टा आढळल्याने खळबळ.

Sampat Devgire

नाशिक : हल्ली रोजच गावठी कट्टा सापडला, विक्री करताना पकडले अशा बातम्या येतात. मात्र नाशिकला (Nashik) चक्क एका तरुणीच्या दुचाकीच्या डिक्कीत गावठी कट्टा आढळल्याने खळबळ उडाली आहे. आता हा गावठी कट्टा कोणाचा, कशासाठी बाळगला होता हा पोलिसांचा (Police) तपासही तेव्हढाच सुरस होण्याची शक्यता आहे. (Local made gun found in seize scooter of young Women)

कर्जाचे हफ्त थकल्याने दुचाकी वाहन जप्त केल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीत गावठी कट्टा आढळल्याने एकच खळबळ उडाली. फायनान्स कंपनी कर्मचाऱ्याने तत्काळ वरिष्ठांना कळविल्यानंतर सदर बाब भद्रकाली पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जुनाट गावठी कट्टा जप्त करीत संशयित तरुणी रिया धनंजय पटवर्धन (२८, रा. काठेगल्ली, द्वारका) हिला अटक केली.

दरम्यान, नातलगाच्या घरात राहण्यास आलेल्या संशयित तरुणीला त्याच घरात सदर कट्टा सापडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, सदर कट्टा कोठून आला आणि त्याची माहिती पोलिसांना न देता तो बाळगण्यामागील हेतू याविषयी पोलिस तपास करीत आहेत.

फायनान्स कंपनी कर्मचारी नरेंद्र गौतम शिलेदार (रा. दत्त चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, रिया पटवर्धन यांनी दुचाकीसाठी वाहन कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाचे हप्ते थकले होते. त्यामुळे शिलेदार हे रविवारी (ता. १३) दुपारी रिया यांच्या घरी थकीत हप्त्यापोटी वाहन जप्त करण्यासाठी गेले होते. त्या वेळी रिया यांनी मोपेड जप्त करून घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, तत्पूर्वी रिया यांनी शिलेदार यांचे वरिष्ठ योगेश कटारे यांना व्हॉटस ॲपवर मेसेज पाठविला होता, तो त्यांना वाचण्यास सांगा, असे सांगितले.

शिलेदार यांनी मोपेड घेऊन कंपनी कार्यालयाच्या दिशेने निघाले असता, त्यांना वाटेतच कटारे यांचा फोन आला आणि मोपेडची डिक्की उघडण्यास सांगितले. शिलेदार यांनी डिक्की उघडली असता, त्यात गावठी कट्टा होता. कटारे यांच्या सूचनेनुसार, शिलेदार हे मोपेड घेऊन पुन्हा रिया यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पोचले. घटनेची माहिती भद्रकाली पोलिसांना दिली. पोलिसही घटनास्थळी पोचले. कट्टा जप्त करीत पोलिसांनी संशयित रिया पटवर्धन या तरुणीविरुद्ध भद्रकाली पोलिसांत हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

कट्टा कुठून आला?

संशयित रिया ही तिच्या आत्याच्या घरात राहते. घराची साफसफाई करीत असताना तिच्या हाती जुना गावठी कट्टा हाती लागला. गंजलेल्या अवस्थेतील सदर कट्टा असला तरी तो बाळगणे गुन्हा असल्याने गुन्हा नोंदविला. मात्र, रियाच्या नातलगांकडे सदर कट्टा कुठून आला, रियाने कट्टा सापडल्यानंतर पोलिसांना का कळविले नाही याबाबतचा तपास भद्रकाली पोलिस करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT