hemant godse sarkaranama
उत्तर महाराष्ट्र

Hemant Godse : एक्झिट पोलमध्ये 'एक्झिट'; विजयासाठी हेमंत गोडसेंची शक्तिस्थळी धावाधाव!

Hemant Godse Vs Rajabhau Waje : मतमोजणीतून खासदार गोडसे हमखास विजयी होतील, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्ते मतमोजणी व्यस्त असताना खासदार गोडसे मात्र तीर्थाटन करीत आहेत.

Sampat Devgire

Nashik News, 3 June : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या ( Nashik Lok Sabha Election 2024 ) एक्झिट पोल नंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी सोमवारी तुळजापूरला भवानी मंदिरात पूजा केली. गेले काही दिवसांपासून ते विविध तीर्थस्थळांना भेटी देत आहे.

मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे. त्यामुळे मतदारांच्या आशीर्वादानंतर गोडसे यांना विजयाची खात्री आहे. यासंदर्भात त्यांनी गेले दहा दिवस विविध तीर्थस्थळांना भेटी देण्याचा धडका लावला आहे. जम्मूला वैष्णोदेवीच्या दर्शनापासून त्यांनी सुरुवात केली.

लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. एक्झिट पोलबाबत विविध मतप्रवाह आहे. सत्ताधारी आघाडीच्या बाजूने बहुतांश जागा दाखविण्यात आले आहे. मात्र, नाशिक मतदारसंघाविषयी वेगवेगळे अंदाज आहे. त्यामुळे खासदार गोडसे ( Hemant Godse ) यांचा जीव टांगणीला लागला आहे.

गोडसे यांनी दोन दिवसांपूर्वी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर कर्नाटकातील श्री वेल्लूर येथे महादेवाच्या दर्शनाला गेले होते. आज सकाळी त्यांनी तुळजापूर येथे भवानी मातेच्या मंदिरात पूजा केली. दुपारी जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनानंतर ते नाशिकला परततील.

शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सध्या मतमोजणीच्या नियोजनात व्यस्त आहेत. उद्याच्या मतमोजणीतून खासदार गोडसे हमखास विजयी होतील, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्ते मतमोजणी व्यस्त असताना खासदार गोडसे मात्र तीर्थाटन करीत आहेत. ही तीर्थयात्रा सफल होऊन तुळजाभवानी खासदार गोडसे यांना कौल देईल काय? याची सध्या चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT