narendra modi sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Lok Sabha Election 2024 : मोदींच्या सभेचा खर्च वादात, राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षानं घेतली हरकत

Narendra Modi News : पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी नगरमध्ये भव्य-दिव्य, असा मंडप होता.

Pradeep Pendhare

Ahmednagar News, 12 May : नगर जिल्ह्यातील महायुतीचे भाजप आणि शिवसेनेना उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची सभा खर्चाच्या मुद्यावरून वादात सापडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरदचंद्र पवार ) नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी हरकत नोंदवली आहे. तसेच, मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि प्रवरा बँकेवर लक्ष ठेवण्याची मागणी राजेंद्र फाळके यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सात मे रोजी नगर शहरात सभा झाली. महायुतीचे भाजपचे नगर दक्षिणचे ( Ahmednagar Lok Sabha Constituency ) उमेदवार खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe Patil ) आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. या सभेसाठी भव्य-दिव्य असा मंडप उभारण्यात आला होता. ऊन तीव्र असल्याने सभास्थळी येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून कुलर, पंखे लावण्यात आले होते. जनरेटर कार्यरत होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भव्य, असे व्यासपीठ उभारण्यात आले होते. या सभेचा खर्च 12 लाख रुपये दाखवण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी हरकत नोंदवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारी यंत्रणेचे गैरवापर करीत हा खर्च कमी दाखवण्यात आला आहे. आमच्या एखाद्या साध्या सभेचा खर्च चार ते पाच लाख रुपये सरकारी यंत्रणांकडून दाखवला जातो. सरकारी यंत्रणेने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दुजाभाव करीत असल्याचा आक्षेप राजेंद्र फाळके यांनी हरकतीत नोंदवला आहे. या संदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे असून, ते निवडणूक आयोगाकडे दाखल करणार असल्याचेही फाळके यांनी म्हटले आहे.

जिल्हा बँक आणि प्रवरा बँकेतील व्यवहारावर लक्ष ठेवा

दरम्यान, नगर जिल्ह्यात उद्या 13 मे रोजी मतदान होत आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे चार दिवस सुट्टीचे आहेत. या काळात सहकारी बँका, पतसंस्था विशेष करून भाजपच्या अधिपत्याखाली असलेली जिल्हा सहकारी बँक आणि तिची शाखा, प्रवरा बँक अनधिकृतपणे, रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये असेच गैरप्रकार निवडणुकीत झाले. त्यामुळे सरकारी यंत्रणेने सतर्क राहून यावर लक्ष ठेवावे. विशेष करून प्रवरा बँकेचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राजेंद्र फाळके यांनी केली.

( Edited BY : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT