Sujay Vikhe, Nilesh Lanke sakarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Vs Lanke : सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी; नगरमध्ये नेमकं काय सुरू?

Lok Sabha Election 2024 : नगरमधील एका गावातील उपसरपंचाने स्थानिक यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीवरून हा राडा सुरू झाल्याचे समोर येत आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Ahmednagar Political News : नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुजय विखे, तर शरद पवार गटाचे निलेश लंके Nilesh Lanke आमनेसामने ठाकले आहेत. विकासकामांवरून त्यांच्यात दररोज खडाजंगी होत असल्याचे पाहायला मिळते. आता एका ऑडिओ क्लिपने मात्र जिल्ह्यातील राजकीय हवा चांगलीच तापली आहे. या व्हायरल क्लिपमधील दोघांतील संवादातून थेट खासदार सुजय विखे यांना गोळ्या झाडणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. Sujay Vikhe Threaten by a man.

नगरमधील Ahmednagar एका गावातील उपसरपंचाने स्थानिक यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीवरून हा राडा सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यात संबंधित उपसरपंचाने विखेंना आपल्या गावातून 60 टक्के मते देण्याचा दावा केला आहे. त्यावरून त्यांना गाडगे नावाच्या व्यक्तीने फोन करून जाब विचारला. तसेच त्यांनी केलेल्या दावाला आधार काय, असे मुद्दे समोर करून शिवगाळही केली. त्यातचे गाडगेने सुजय विखे यांना गोळ्या घालणार असल्याचे वक्तव्यही केले.

ही ध्वनीफित समोर येताच भाजपने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तक्रार केली. तसेच त्यामागील सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करवी. यासह सुजय विखे पाटलांच्या Sujay Vikhe जीवाला धोका असल्याचे सांगत त्यांना झेड सुरक्षा देण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली. मात्र या प्रकरणी कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे समजते. दरम्यान, हे प्रकरण तापल्याचे पाहून निलेश लंकेच्या कार्यालयाकडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला.

त्या व्हिडिओत ध्वनीफितमधील गाडगे, ते राष्ट्रवादी काँग्रेस अथवा निलेश लंके Nilesh Lanke यांचे कार्यकर्ते नसल्याचे सांगतात. ते मुंबईत शिंदे गटाचे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच व्हायरल झालेली ऑडियो क्लिप ही फेक असल्याचा दावा करुत त्यांनी याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान, या क्लिपने मात्र नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चांगलाच तणाव निर्माण केला होता.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT