Dy. CM Ajit Pawar & Nivrutti Aringale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar News : नाशिक लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचाही दावा!

Loksabha election politics, Now NCP Ajit Pawar group also in the race-अजित पवार यांनी दिली तयारीला लागण्याची सुचना, व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांसह विविध इच्छुक करताहेत उमेदवारीसाठी

Sampat Devgire

NCP & BJP Politics : नाशिक लोकसभा मतदारसंघ कोणाचा याबाबतचा गोंधळ वाढतच आहे. सध्याचे खासदार हेमंत गोडसे भाजपसोबत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आहेत. त्यांनी या जागेवार दावा सांगितलेला असतानाच त्यात आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटानेही येथून उमेदवार देण्याची चाचपणी सुरू केली आहे. (Nashik Loksabha constituency`s present MP is of Shivsena Eknath Shinde Group)

नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष (BJP) अतिशय जोमाने तयारी करीत आहे. मात्र हा शिवसेनेचा (Shivsena) परंपरागत मतदारसंघ असल्याने महाविकास आघाडीकडून येथे विविध इच्छुक उमेदवार आहेत. त्यात अजित पवार (Ajit Pawar) कितपत यशस्वी होतील याबाबत चर्चा आहे.

हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी विविध राजकीय पक्ष सरसवलेले आहेत. त्यात सर्वाधीक अपेक्षेने मुख्यमंत्री शिंदे गटाची इच्छा आहे. येथील विद्यमान खासदार हेमंत गोडसे सध्या शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे भाजप आणि त्यांच्यात रस्सीखेच आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार गटही मागे नाही. नुकतेच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना नाशिक लोकसभेसाठी कामाला लागा, असे आदेश दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पुढील वर्षी सुरू होईल. त्याला अतिशय कमी कालावधी आहे. अवघ्या काही महिन्यात निवडणूक अपेक्षित असताना आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट देखील पुढे आला आहे. या मतदारसंघावर त्यांनी दावा करावा अशा हालचाली आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत उपमुख्यमंत्री पवार गटाने नाशिक लोकसभेची जागा लढवावी, असा आग्रह धरला होता. त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या सरकारमध्ये असलेले तिन्ही गट यानिमित्ताने नाशिक मतदारसंघावर लक्ष ठेऊन आहेत. त्यातून शिंदे गट की पवार गट अशी राजकीय शह, काटशहाचे राजकारण घडण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केल्याचा दााव काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहे. यात अजित पवार गटाचा चांगला होल्ड आहे. मित्रपक्ष एकत्र येऊन ही जागा पमुख्यमंत्री पवार गटाला सुटल्यास या मतदारसंघात यश येईल त्यांचा निष्कर्ष आहे. याबाबत लवकरच जागा वाटपाची चर्चा होणार आहे. त्यात याबाबत पवार गट त्यांनी यापुर्वी दावा केल्या चार मतदारसंघांसह नाशिकची मागणी करू शकतो. नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे याबाबत इच्छुक उमेदवार आहेत. नवीन चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT