Neelamtai Gorhe, Devendra Fadanvis & Rajesh Rathod Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Winter Session : राजेश राठोड यांच्या संरक्षणासाठी नीलमताई गोऱ्हे आल्या मदतीला!

Sampat Devgire

Maharashtra Politics : आमदार राजेश राठोड यांच्या वाहनावर यापूर्वी दोनदा हल्ला झाला होता. त्यांना समाजकंटकांकडून धमक्या आल्या होत्या. त्यानंतर सभागृहात मागणी केल्यावर त्यांना पोलिस संरक्षण देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, त्यावर काहीच कारवाई न झाल्याने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सदस्यांनी हा प्रश्ना लावून धरला होता. (Congress MLC didn`t got police security after Home ministers assurance)

आज विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच. शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी या प्रश्नावरून राज्य सरकारला धारेवर धरले. यावर भाजपचे (BJP) मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी निवेदन करण्याचा आग्रह धरला. त्यात सभापतींना हस्तक्षेप करावा लागला.

गुरुवारी आमदार राठोड यांनी हा विषय सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, हे विशेष. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी आज परिषदेचे कामकाज सुरू होतानाच पुन्हा राजेश राठोड यांच्या पोलिस संरक्षणाचा विषय मांडला. काल याबाबत चर्चा झाली होती. त्याआधी सभागृहात या विषयावर चर्चा झाली होती. त्यात विधान परिषदेच्या सदस्यालाच संरक्षण मिळत नसेल, तेच असुरक्षित असतील तर ते योग्य नाही.

आज मी याबाबत राठोड यांना विचारले, आपल्या पोलिस संरक्षणाबाबत काही झाले का?. त्यावर त्यांनी काहीच झालेले नसल्याचे सांगितले. एक सदस्य आपला जीव पणाला लाऊन आपली व्यथा मांडतो, आणि सरकार याबाबत काहीही करत नाही. याबाबत राज्य सरकार गंभीर नसेल तर चिंता वाटतो. याबाबत किमान निवेदन तरी करावे.

त्यावर चंद्रकांत पाटील यांनी कामकाजात मधला वेळ मिळाला की, मी राठोड यांसह संबंधितांशी बोलतो. काल याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. तसे निर्देशदेखील दिले होते, त्यावर काय झाले हो मी स्वतः बघतो, असे सांगितले.

त्यावर सदस्य संतप्त झाले. त्यानंतर सभापती गोऱ्हे यांनी सर्वांना शांत करीत, सरकारने दखल घेतली आहे. त्यामुळे कारवाई होईल. मात्र, आज कामकाज संपल्यावर आपण माझ्या दालनात या, मी स्वतः महासंचालकअथवा गृहमंत्री यांच्याशी संपर्क करते, असे सांगत त्या आमदार राठोड यांच्या मदतीला धाऊन आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT