Bhausaheb Kamble Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News : मोठी बातमी, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराचा पाठलाग, वाहनावर गोळीबार; नेमकं काय घडलं, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Shivsena Shinde Shrirampur Candidate Bhausaheb Kamble incident: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार यांच्या वाहनाच्या दिशेने गोळीवर करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या काही तासांपूर्वी नाट्यमय घडामोडी घडत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा वाहनाचा पाठलाग करून त्यांच्या वाहनाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला आहे.

श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव आहे. इथं महायुतीकडून (Mahayuti) ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना देखील एबी फाॅर्म मिळाला. त्यामुळे त्यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकून आहेत. मतदानाच्या काही तासांपूर्वी त्यांच्या वाहनावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

भाऊसाहेब कांबळे यांच्या फिर्यादीनुसार हल्लोखार दुचाकीवरून पाठलाग करून वाहनाच्या दिशेने गोळीबार केला. कांबळे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात श्रीरामपूर पोलिसांनी (Police) गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत माहिती अशी

शिवसेना उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या वाहनावर मंगळवारी मध्यरात्री साडेअकरा वाजता गोळीबार झाला. कांबळे हे डॉ. संजय फरगडे, जनार्धन गालपगारे, संजय लबडे, चेतन तनपुरे यांचेसह मतदार संघात होते. तिथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटून आम्ही वाहनाने रात्री एक वाजता श्रीरामपूरकडे निघाले. यावेळी वाहनाचा दोन दुचाकीवरील व्यक्ती पाठलाग करत होते.

असा झाला गोळीबार

श्रीरामपूरमधील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाहन थांबले, तेथून पुढे श्रीरामपूरच्या दिशेने वाहन काढत असताना पाठलाग करणाऱ्या दुचाकीवरून एका व्यक्तीने कंबरेतून पिस्तूल काढून वाहनाच्या दिशेने गोळीबार केला, असे भाऊसाहेब कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गोळीबार होत असल्याने जीव वाचवण्यासाठी आम्ही वेगाने वाहन पळविले. श्रीरामपूरमध्ये आल्यावर प्रकाश चित्ते यांना झालेला सर्व प्रकार सांगितला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT